नियमांचे उल्लंघन, १२ दुकाने केली सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:36 AM2021-05-08T04:36:44+5:302021-05-08T04:36:44+5:30
लाेणार : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी शासनाने विविध उपाययाेजना सुरू केल्या आहेत. १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली असून, जीवनाश्यक वस्तूंची ...
लाेणार : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी शासनाने विविध उपाययाेजना सुरू केल्या आहेत. १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली असून, जीवनाश्यक वस्तूंची दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ दरम्यान सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून लाेणार शहरात दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन हाेत आहे. त्यामुळे, नगरपालिका प्रशासनाने ७ मे राेजी धडक कारवाई करून शहरातील १२ दुकाने सील केली, तसेच दुकानदारांकडून १६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
लाेणार शहरात लाॅकडाऊन कालावधीतही काही व्यापारी दुकाने सुरू ठेवून नियमाचे उल्लंघन करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी शहरात धडक मोहीम राबवून १२ दुकाने सील केली, तसेच १६ हजार रुपयांचा दंड वसूल केला, तसेच व्यवसाय परवानाही रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी दिली. शहरात गत काही दिवसांपासून जीवनाश्यक वस्तूंऐवजी इतरही दुकानदार आपली दुकाने सुरू ठेवत हाेते. नगरपालिका प्रशासनाने वारंवार व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही दुकाने सुरू ठेवण्यात येत असल्याने नगरपालिकेच्या पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत न. प. कर अधीक्षक अनवर शहा, न.प. कर्मचारी सुधीर काळे, निसार खान, मनोज सरदार, फुलचंद भगत, गजानन बाजड, अशोक मोरे व पोलीस कर्मचारी सहभागी होते.