नियमांचे उल्लंघन, ९८ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:28+5:302021-05-26T04:34:28+5:30
बार्टीच्या वतीने ऑनलाईन वेबिनार बुलडाणा : शासनाच्या बार्टी संघटना व बुलडाणा समतादूत प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने मनुस्मृती व भारतीय ...
बार्टीच्या वतीने ऑनलाईन वेबिनार
बुलडाणा : शासनाच्या बार्टी संघटना व बुलडाणा समतादूत प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने मनुस्मृती व भारतीय संविधान : एक तुलनात्मक समीक्षा या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे २१ मे रोजी आयोजित केले होते. या विषयावर मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले़
रुग्णांच्या नातेवाइकांनी डाॅक्टरांचा सन्मान करावा
बुलडाणा : डॉक्टर मंडळी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या या संकट काळात रुग्णसेवा देत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी, नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी डॉक्टरांचा योग्य तो सन्मान करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी केले.
काेविड सेंटरवरील डाॅक्टरांना सुरक्षा द्या
बुलडाणा : कोरोनासारख्या महामारीमध्ये आपल्या जिवाची बाजी लावून कुटुंबाची पर्वा न करता कोरोना काळात शासकीय आरोग्य सेवा देण्याच्या कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या नातेवाइकांच्या राेषाच्या सामना करावा लागत आहे़ त्यामुळे, या डाॅक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी हाेत आहे़
पिंप्री खंदारे ते शिंदी रस्त्याची दुरवस्था
बिबी : लाेणार तालुक्यातील पिंप्री खंदारे ते शिंदी रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे़ रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता आहे़ त्यामुळे, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़
शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
बुलडाणा : जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा तसेच त्यांच्या अधीनस्थ कार्यालये यांना केवळ शेतीशी निगडित गहाण खत, हायपोथिकेशन व इंटीमेशन नोटीस आदी कामकाज करण्याकरिता परवानगी देण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़
खतांचे दर फलक लावण्याची मागणी
चिखली : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुक्यांतील सर्व रासायनिक खते, औषध, बी-बियाणे विक्री करणाऱ्या परवानाधारकांना आपल्या कृषी केंद्रासमोर दर्शनी भागात, खत, औषध, बियाण्यांची किंमत स्पष्ट अक्षरात डिजिटल फलकावर जाहीर करावी, अशी मागणी शेख मुख्तार यांनी केली आहे़
काेराेना टेस्ट करूनच व्यवसाय करावा
लाेणार : काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात येत आहे़ सकाळी ७ ते ११ दरम्यान दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़ त्यामुळे, व्यावसायिकांनी काेराेना चाचणी करूनच दुकाने सुरू करावी, आवाहन लाेणार नगर पालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी केले आहे़
काेराेना रुग्णांसाठी माेफत भाेजन
हिवरा आश्रम : येथील ग्रामीण रुग्णालयात काेविड सेंटर सुरू करण्यात आले आहे़ या काेविड रुग्णालयात दाखल झालेल्या काेराेना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी आमदार संजय रायमुलकर यांच्यावतीने माेफत भाेजन पुरवण्यात येत आहे़
शेतकरी वळले शेडनेट शेतीकडे
बुलडाणा : तालुक्यातील अनेक शेतकरी आता शेडनेट शेतीकडे वळले आहेत. शेडनेटगृहाची उभारणी करून विविध पिकांची लागवड केली आहे. महाराष्ट्र शासन एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेट गृह तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले आहे.
पाच हजार मजुरांच्या हाताला मिळाले काम
बुलडाणा: जिल्ह्यात रब्बी हंगामानंतर मजुरांना कामे मिळणे कठीण झाले असताना रोहयोची कामे वाढविणे आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यातील ४०० ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामे केली जात असून, या कामांवर ५ हजार ८९२ मजूर कार्यरत आहेत.