नियमांचे उल्लंघन; ५३़ ७१ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:08 AM2021-07-13T04:08:18+5:302021-07-13T04:08:18+5:30
प्रवासी निवारा उभारण्याची मागणी किनगाव जट्टू : येथील बस स्थानकावर प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा ...
प्रवासी निवारा उभारण्याची मागणी
किनगाव जट्टू : येथील बस स्थानकावर प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तातडीने प्रवासी निवारा उभारण्याची मागणी हाेत आहे़
मलगी फाट्यावर गतिराेधक बसवा
बुलडाणा : चिखली तालुक्यातील मलगी फाट्यावर गतिराेधक बसविण्याची मागणी निवृत्ती भानुदास पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या मार्गावर माेठ्या प्रमाणात वाहतूक असते.
तणनाशक फवारणीकडे शेतकऱ्यांचा कल
बिबी : पेरलेल्या पिकातील तण जोमाने वाढून पिकाला धोका पोहोचविते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते व वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकटही ओढवते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच तणनाशकाची फवारणी सुरू केली आहे.
पाेकराचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करा
बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवडलेल्या गावांमधील शेतकऱ्यांचे डेस्कनुसार प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, असे आदेश कृषी विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आले.
नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी
चिखली : तालुक्यात १६ जून राेजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उंद्री, वैरागड, हरणी, टाकरखेड, अमडापूर, मुंगी, धानोरी, किन्ही सवडद, घानमोड व अमडापूर मंडळामधील शेतजमीन खरडून गेली आहे. त्यामुळे, मदत देण्याची मागणी हाेत आहे.
निमगाव वायाळ रस्त्याची दुरवस्था
सिंदखेड राजा : तालुक्यातील किनगाव राजा ते रोहणा फाटादरम्यान किनगाव राजा ते निमगाव वायाळ रस्त्याची मागील सात ते आठ वर्षांपासून दुरवस्था झाली असून, या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे.