नियमांचे उल्लंघन, ५.५९ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:57+5:302021-05-26T04:34:57+5:30

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लावले होते. त्यानुषंगाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिकेने ९ पथके गठीत केली होती. ...

Violation of rules, fine of Rs 5.59 lakh | नियमांचे उल्लंघन, ५.५९ लाखांचा दंड

नियमांचे उल्लंघन, ५.५९ लाखांचा दंड

Next

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लावले होते. त्यानुषंगाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिकेने ९ पथके गठीत केली होती. समन्वयक म्णून पालिका अधीक्षक एकनाथ गोरे तर पथकप्रमुख म्हणून पराग सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पालिकेच्या या ९ पथकांनी १ जानेवारी ते २५ मे दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून हा दंड वसूल केला आहे. यामध्ये मास्क न घालणाऱ्यांकडून १ लाख ९१ हजार ६०० रुपये संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक, व व्यापाऱ्यांकडून ३ लाख २ हजार २०० रुपये वसूल केले आहेत. यासोबतच शारीरिक अंतराचे पालन न करणाऱ्यांकडून ५२ हजार तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून १३ हजार ३०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title: Violation of rules, fine of Rs 5.59 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.