खामगावात विहिंप बजरंगदलाची तीव्र निदर्शने, जम्मू काश्मीर येथे यात्रेंकरूवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

By अनिल गवई | Published: June 12, 2024 04:29 PM2024-06-12T16:29:49+5:302024-06-12T16:30:16+5:30

यावेळी उपविभागीय अधिकारी, अप्पर पोलीस अधिकारी आणि आमदार ॲड. आकाश फुंडकर यांना निवेदन देण्यात आले.

Violent protests by VHP Bajrang Dal in Khamgaon, protest against terrorist attack on pilgrims in Jammu Kashmir | खामगावात विहिंप बजरंगदलाची तीव्र निदर्शने, जम्मू काश्मीर येथे यात्रेंकरूवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

खामगावात विहिंप बजरंगदलाची तीव्र निदर्शने, जम्मू काश्मीर येथे यात्रेंकरूवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

खामगाव: शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तल, चोरी आणि वाहतुकीवर कारवाई करण्यात यावी. तसेच ९ जून रोजी जम्मू काश्मीर येथे यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विहिंप बजरंगदलाच्यावतीने बुधवारी तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी, अप्पर पोलीस अधिकारी आणि आमदार ॲड. आकाश फुंडकर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनानुसार, महाराष्ट्रात गौवंश हत्या प्रतिबंधक कायदा असूनही खामगाव तालुक्यात गोवंश कतलीचे व चोरीचे त्याचा वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. येत्या काही दिवसात बकरी ईद असून प्रमाण अधिक वाढणार आहे. त्यावर कडक कारवाई व्हावी तसेच ०९ जून रोजी, इस्लामिक जिहादी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये धार्मिक यात्रेसाठी आलेल्या हिंदू यात्रेकरूंवर माता वैष्णोदेवी कटरा येथून शिवखोडीकडे जात असताना हल्ला केला. यावेळी झालेल्या गोळीबारात दहा १० यात्रेकरू ठार झाल्याचा यावेळी तीव्र निषेध नोंदविण्यात आला. विहिंप बजरंग दलाच्यावतीने बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी दहशतवाद्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात विहिंप बजरंग दलाचे ॲड. अमोल अंधारे, गजानन धोरण, सुशील कोल्हे, पवन माळवंदे, आशीष लांडगे, राजेंद्रसिंह राजपूत, अमोल जोशी, गजानन कुर्हाडे, सचिन चांदूरकर, शुभम मुधोळकर, मंगलाताई गुरव, सविताताई बडगुजर, रोशनी तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Violent protests by VHP Bajrang Dal in Khamgaon, protest against terrorist attack on pilgrims in Jammu Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.