जिल्ह्यात पसरला ‘व्हायरल फिव्हर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:03 AM2017-10-12T01:03:56+5:302017-10-12T01:04:36+5:30
बुलडाणा : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या ‘व्हायरल फिव्हर’ची साथ पसरली आहे. विषाणूमुळे खोकला, ताप याबरोबरच पांढर्या पेशी कमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयेसुद्धा गजबजली असून, ६0 टक्के रुग्ण विषाणूजन्य तापाचे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या ‘व्हायरल फिव्हर’ची साथ पसरली आहे. विषाणूमुळे खोकला, ताप याबरोबरच पांढर्या पेशी कमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयेसुद्धा गजबजली असून, ६0 टक्के रुग्ण विषाणूजन्य तापाचे आहेत.
गत आठ दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे विविध सा थीच्या आजाराने डोके वर काढले आहे. व्हायरल अर्थात विषाणूजन्य तापाने जिल्ह्यात लहान मुलांसह मोठय़ांनाही ग्रासले आहे. गावोगावी दोन-चार घरांमध्ये विषाणूजन्य तापाचा रुग्ण आढळून येत आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये खोकला, थंडी-तापाचे रुग्ण फार मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यातच मागच्या आठ दिवसांपासून तापाच्या रुग्णांत पांढर्या पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थि तीत विषाणूजन्य तापाचे प्रमाण सर्वच रुग्णालयांमध्ये सर्वाधिक आहे, तसेच ढगाळ वातावरणामुळे श्वसनविकारही वाढलेले दिसून येत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही खोकला, हात- पाय, डोके दुखणे व तापाने रुग्ण फणफणत असल्याने शेतीची कामेसुद्धा खोळंबली आहेत. सध्या खरीप हंगामातील कामे शेवटच्या टप्प्यात आलेली असताना विषाणूजन्य तापाने डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांना शेतातील कामे सोडून या आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजारामध्ये केवळ लहान किंवा मोठय़ा रुग्णांचा समावेश नसून, सर्वच वयोगटातील रुग्ण सध्या ‘व्हायरल फिव्हर’ने त्रस् थ आहेत. खासगी रुग्णालयामध्ये ‘व्हायरल फिव्हर’च्या रुग्णांचे प्रमाण जवळजवळ ६0 टक्के आहे, श्वसनविकार असलेल्या रुग्णांचे प्रमाण २0 ते २५ टक्क्यांपर्य्ंत व १५ ते २0 टक्के इतर आजाराच्या रुग्णांचे प्रमाण आहे. मागील आठवड्यापासून रुग्णांचे प्रमाण वाढलेले असतानाही आरोग्य विभाग मात्र दुर्लक्षित आहे.
ढगाळ वातावरणाने अस्थमा रुग्ण त्रस्थ
‘गेल्या चार ते पाच दिवसांपासून परतीच्या पावसामुळे थैमान घा तले आहे. पाऊस उघडल्यानंतरही ढगाळ वातावरण राहत आहे. या ढगाळ वातावरणाचा दमा (अस्थमा) रुग्णांना सर्वाधिक त्रास होतो.
दमा या आजारांमध्ये केवळ वृद्धांचाच समावेश नाही, तर, लहान मुलांचाही समावेश आहे. बालकांमध्ये मुळातच प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे या वयोगटातील बालकांना या आजाराचा सर्वाधिक फटका बसत आहे.
डेंग्यूसदृश, निमोनिया तापाची भीती
व्हायरल फिव्हर’ अर्थात विषाणूजन्य तापाने जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालये गजबजली आहेत. जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाने व निमोनिया तापाने मृत्यू झाल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे ‘व्हायरल फिव्हर’च्या रुग्णांचे प्रमाणही हळूहळू वाढत असल्याने डेंग्यूसदृश तापाने व निमोनिया तापाची भीती रुग्णांमध्ये निर्माण झाली आहे. रुग्णालयातील ‘ओपीडी’सह ‘आयपीडी’देखील २0 ते २५ ट क्क्यांनी वाढली आहे.
‘व्हायरल फिव्हर’चे सध्या ६0 टक्के रुग्ण वाढले आहेत. वा तावरणातील बदलामुळे रुग्णांची संख्या वाढत असून, खासगी रुग्णालये गजबजली आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत प्रत्येकाने स्वच्छता व आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ.पंजाबराव शेजोळ, मेहकर