मेहकर शहरात श्रींच्या पालखीचे घेतले भाविकांनी दर्शन
By ram.deshpande | Published: July 26, 2017 01:32 AM2017-07-26T01:32:56+5:302017-07-26T01:33:37+5:30
मेहकर : खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ-मृदंग तर मुखी श्रींच्या नावाचा जप करीत शेकडो वारकºयांसह संत श्री गजानन महाराजांच्या पालखीसह पायी दिंडीचे २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मेहकर शहरात आगमन झाले. यावेळी हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या पालखीचे शारंगधर नगरीत जल्लोषात स्वागत केले.
परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा सोमवारचा मुक्काम लोणार येथे होता. लोणार येथील मुक्कामानंतर सुलतानपूर मार्गे मंगळवारला पालखीचे सायंकाळी मेहकर येथे आगमन झाले. पालखी येणार म्हणून सकाळपासूनच पालखी मार्गावर ठिकठिकाणी भक्तांनी मंडप लावून व रांगोळी काढून जय्यत तयारी केली होती. शहरात पालखीचे आगमन होताच ढोल-ताशा व फटाक्यांची आतषबाजी आणि टाळ-मृदंगाच्या तालावर वारकºयांनी ताल धरला. गावातून बालाजींच्या मंदिरात श्रींची पालखी मुक्कामासाठी थांबली असता हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दरम्यान, श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी मेहकर शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी दर्शनासाठी शहरात एकच गर्दी केली होती. पालखीच्या मुक्कामाची व्यवस्था येथील शारंधर बालाजी मंदिरात करण्यात आली होती, तर जेवणाची व्यवस्था रवि अग्रवाल यांच्यासह आदींनी केली होती.
दरम्यान, सारंगपूर फाट्यावर श्रींच्या पालखीचे आगमन होताच दलितमित्र शिवाजीराव नवघरे, सुभाष निकस, नंदु बोरे यांनी पालखीचे दर्शन घेतले.
तसेच मेहकर शहरात श्रींच्या पालखीचे आगमन होताच पैनगंगा नदीच्या तीरावर नगर परिषदेच्यावतीने नगराध्यक्ष कासम गवळी, उपाध्यक्ष जयचंद बाठीया, शिवसेना गटनेते संजय जाधव, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, पंकज हजारी, ललित इन्नाणी, राजेश अंभोरे, नीलेश मानवतकर, नीलेश सोमण, मुजीब खान, तौफी कुरेशी, मनोज जाधव, संतोष पवार, समाधान सास्ते यांनी पालखीचे स्वागत केले, तसेच कृउबासच्यावतीने सभापती माधवराव जाधव, बबनराव तुपे यांच्यासह डॉ.सुभाष लोहिया, डॉ.डी.एफ.माल. आशिष रहाटे, डॉ.विलास वºहाडे, गोपाल मोदाणी, सुरेश वाळूकर, भरत सारडा, अनिल शर्मा, विलास चनखोरे, अॅड.शैलेश देशमुख, गजेंद्र माने, जयदीप देशमुख, कलीम खान, भूषणभय्या देशमुख, सुदेश लोढे, सुरेश मुंदडा, बाळासाहेब सावजी, अॅड.अनंतराव वानखेडे, मधुकरराव गवई, कैलास सुखधाने, शैलेश बावस्कर, नावेदखान, शे.अजगर यांच्यासह शहरातील भाविकांनी श्रींच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी शिवचंद्र मित्रमंडळ, राजमुद्रा संघटना, रामदास वेटाळ, जयमाता दी मित्रमंडळतर्फे स्वागत करण्यात आले, तसेच इमामवाडा चौकात मुस्लीम बांधवांनीही पालखीचे स्वागत केले.