विषाणूजन्य आजारांनी ग्रामस्थत्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:48 PM2017-09-15T23:48:36+5:302017-09-15T23:49:11+5:30

हिवरा खुर्द: वातावरणातील अचानक उद्भवलेल्या  बदलामुळे हिवराखुर्द परिसरातील अंबाशी, मुंदेफळ, उटी,  घुटी, पारडी या गावांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारख्या  विषाणूजन्य आजारांची लागण झाल्याने नागरिक कमालीचे  त्रस्त झाले आहेत.

Vitamin B in diseases | विषाणूजन्य आजारांनी ग्रामस्थत्रस्त

विषाणूजन्य आजारांनी ग्रामस्थत्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्देवातावरणातील बदल कारणीभूतसाथीमुळे दवाखान्यामध्ये रुग्णांची गर्दी वाढली 

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा खुर्द: वातावरणातील अचानक उद्भवलेल्या  बदलामुळे हिवराखुर्द परिसरातील अंबाशी, मुंदेफळ, उटी,  घुटी, पारडी या गावांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारख्या  विषाणूजन्य आजारांची लागण झाल्याने नागरिक कमालीचे  त्रस्त झाले आहेत.
हिवराखुर्द परिसरात उन, पावसाच्या खेळामुळे सर्दी, खोकला  आणि ताप यासारख्या विषाणूजन्य आजारांना पोषक वा तावरण निर्माण झाल्यामुळे त्यातच ग्रामपंचायत, आरोग्य  विभागाच्या स्वच्छतेबाबतच्या दुर्लक्षामुळे हे आजार बळावले  आहेत. दरम्यान, तापाच्या साथीने फणफणणार्‍या रुग्णांची  खासगी दवाखान्यामध्ये गर्दी वाढली आहे. बर्‍याच रुग्णांना  जानेफळ येथून बुलडाणा, औरंगाबाद येथे उपचारासाठी  हलविण्यात आले आहे. तापाची साथ सुरू असताना  आरोग्य विभागाचे एकही पथक गावात आले नसून, औषधी  व धूर फवारणीची मागणी होत आहे. 

Web Title: Vitamin B in diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.