‘विठ्ठला’ प्रमाणेच झाडांचीही भक्ती करा; वृक्षदिंडी काढून पटविले महत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:04 PM2018-07-25T13:04:26+5:302018-07-25T13:05:45+5:30

जागर मल्टिपर्पज फाउंडेशनच्या वतीने मलकापूर ते बुलढाणा वृक्ष दिंडी काढून वृक्ष लावण्याचे आवाहन करतानाच, प्रत्यक्ष वृक्षलागवडही करण्यात आली.

Like 'Vitthala' also worship the trees; the tree plantation | ‘विठ्ठला’ प्रमाणेच झाडांचीही भक्ती करा; वृक्षदिंडी काढून पटविले महत्व

‘विठ्ठला’ प्रमाणेच झाडांचीही भक्ती करा; वृक्षदिंडी काढून पटविले महत्व

Next
ठळक मुद्देवृक्ष लावा वृक्ष जगवा या बाबीवर भर देताना प्लास्टिकबंदी बाबतही ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. आय.एम.ए.चे शहरातील सर्व डॉक्टर या दिंडीत सहभागी झाले होते.या वृक्षदिंडीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. 


- मनोज पाटील
मलकापूर :     पंढरीच्या पांडुरंगाची सर्वच जण पुजा करतात. आषाढी एकादशीला तर भक्तांच्या उत्साहाला पारावार राहत नाही. हे करत असतानाच, ज्यांच्या भरवश्यावर पर्यावरणाचा समतोल अवलंबून आहे अशा झाडांचीही पुजा करा अर्थात झाडे लावा, असा संदेश विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूरात देण्यात आला. आषाढी एकादशीला समाजात जनजागृती करण्यासाठी  जागर मल्टिपर्पज फाउंडेशनच्या वतीने मलकापूर ते बुलढाणा वृक्ष दिंडी काढून वृक्ष लावण्याचे आवाहन करतानाच, प्रत्यक्ष वृक्षलागवडही करण्यात आली.
वृक्ष लावा वृक्ष जगवा या बाबीवर भर देताना प्लास्टिकबंदी बाबतही ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. आषाढी एकादशीला वारकरी मोठ्या श्रद्धेने विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्याकरीता वारी करतात. या दिवसाचे औचित्य साधत  जागर मल्टिपर्पज फाउंडेशन च्या वतीने वृक्षाला दैवत मानून पूजन करीत वृक्ष दिंडीतून शेकडो वृक्षांचे व वृक्षबिजांचे रोपण करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या दिंडीदरम्यान प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावावे व ते जगवावे असा आग्रह मलकापूर, दाताळा, शेलापूर, मोताळा,बुलढाणा या मार्गात नागरीकांकडे लावून धरण्यात आला.
प्रत्येकाने देखभाली करीता किमान एक वृक्ष दत्तक घेतल्यास या भूमीवर पुन्हा नंदनवन फुलू शकते, या बाबीचे महत्व पटवून देण्यात आले. वृक्ष दिंडी द्वारे राजूर घाटात मोठ्या प्रमाणात बीजारोपण करण्यात आले. या वृक्षदिंडीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.  आय.एम.ए.चे शहरातील सर्व डॉक्टर या दिंडीत सहभागी झाले होते.
वृक्षदिंडीतील या वारकºयांमध्ये डॉ.नितीन बºहाटे, डॉ.सोनाली बºहाटे, विजय बढे, विजय राणे, सौ.सीमा राणे, संदीप झोपे, विष्णू संभारे, मिलिंद भारंबे, गजेंद्र बावस्कर, मनीष नाफडे,गजेंद्र चव्हाण, सचिन खाचणे, प्रमोद कोलते, चंद्रकांत वर्मा यांच्यासह  जागर मल्टिपर्पज फाउंडेशनचे वारकरी, नागरीक या वृक्षदिंडीत सहभागी झाले.(प्रतिनिधी)

Web Title: Like 'Vitthala' also worship the trees; the tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.