विवेकानंद आश्रम सामाजिक एकात्मतेची पंढरी- पोलीस अधिक्षक भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 06:07 PM2018-09-07T18:07:17+5:302018-09-07T18:08:06+5:30
विवेकानंद आश्रम सामाजिक एकात्मतेची पंढरीच आहे, असे भावपूर्ण उद्गार जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी केले.
हिवरा आश्रम : विवेकानंद आश्रम ही सर्व जाती, धर्म, पंथाच्या सेवेसाठी झटणारी संस्था आहे. ‘सेवा परमो धर्म’ हा विचार या भूमीचा गुणधर्म आहे. शुकदास महाराजांनी जनसेवेसाठी स्थापन केलेला हा विवेकानंद आश्रम सामाजिक एकात्मतेची पंढरीच आहे, असे भावपूर्ण उद्गार जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी केले.
विवेकानंद आश्रमात पोलीस विभागाने ६ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले होते. तर प्रमुख वक्ते म्हणून हभप गजानन शास्त्री महाराज, शेख सलालुद्दीन हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाशुकदास महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यात आले. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी व उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शुकदास महाराजांच्या अनुभूतीतून जोपासले गेलेले धर्म ऐक्य व सद्यपरिस्थीत आवश्यक असलेले ऐकातमतेचे विचार समान असल्याची माहिती हभप गजानन शास्त्री महाराज यांनी दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.