विवेकानंद आश्रम राष्ट्रनिर्माणाधीन सेवाभावी संस्था - जोगेंद्र कवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:54+5:302021-07-18T04:24:54+5:30
आश्रमात आगमनानंतर त्यांनी भगवान बुद्ध, स्वामी विवेकानंद, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमांचे पूजन करून महाराजांच्या समाधीचे पूजन व ...
आश्रमात आगमनानंतर त्यांनी भगवान बुद्ध, स्वामी विवेकानंद, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमांचे पूजन करून महाराजांच्या समाधीचे पूजन व दर्शन केले. यावेळी त्यांचा आश्रमाच्या वतीने शाळ, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले. शासनाने महाराजांच्या मानवसेवाकार्याची दखल घेऊन तसेच त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मविभूषण प्रदान करून गौरवान्वित करावे ही अपेक्षा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले, मेहकर तालुकाध्यक्ष कैलास नरवाडे, सारनाथ बुद्धविहाराचे अध्यक्ष शिवाजीराव घोंगडे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार बी. टी. सरकटे, नितीन इंगळे, इत्यादी उपस्थित होते. आश्रमाच्या वतीने अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे स्वागत केले. याप्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले, नारायण भारस्कर, गंगाधर निकस, इत्यादी उपस्थित होते.
शुकदास महाराजांच्या कार्याचा अभिमान
शुकदास महाराजांनी केलेल्या अलौकिक कार्याचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांचे सर्वधर्मसमभाव व समाजपरिवर्तन घडविण्याचे कार्य एकसंध राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मैलाचा दगड म्हणता येईल. महाराजांच्या कल्पनेतून साकारलेले आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आणि सोबतच सुंदर असे पर्यटन केंद्र म्हणून विवेकानंद आश्रमाच्या रूपाने त्यांची स्मृती सतत देत राहील, असेही प्रा़ जाेगेंद्र कवाडे यांनी सांगितले़