हिवराआश्रम येथे ६ जानेवारीपासून विवेकानंद जन्मोत्सव; हजारो स्वयंसेवक सेवा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:14 PM2018-01-02T14:14:30+5:302018-01-02T14:16:33+5:30
हिवरा आश्रम : हिवराआश्रम येथे ६ जानेवारीपासून आयोजित विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता ८ जानेवारीला महाप्रसाद वितरणाने होणार आहे. दरम्यान, महाप्रसादासाठी येणाºया भाविकांचे महापूजन करण्यात येणार आहे.
हिवरा आश्रम : हिवराआश्रम येथे ६ जानेवारीपासून आयोजित विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता ८ जानेवारीला महाप्रसाद वितरणाने होणार आहे. दरम्यान, महाप्रसादासाठी येणाºया भाविकांचे महापूजन करण्यात येणार आहे. विवेकानंद जन्मोत्सवास येणारे भाविक म्हणजे चालते-बोलते देवच आहेत, अशी भावना ठेवून त्यांच्यात ईश्वरत्व पाहणारे शुकदास महाराज यांनी आपला देह त्यागण्यापूर्वी २०१५ मध्ये साजरा झालेल्या विवेकानंद जन्मोत्सवात महाप्रसादास आलेल्या भाविकांची चंदन तिलक लावून व धुप ओवाळून पूजा केली होती. एकप्रकारे ती परमईश्वराचीच महापूजा होती. यंदाच्या महाप्रसाद वाटपावेळीही ही महापूजा केली जाणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. ही परंपरा आता खंडित होणार नाही, पूजन करून त्यांना महाराजश्रींच्या मायेचे महाप्रसादाचे दोन घास खाऊ घातले जातील, असेही गोरे म्हणाले. लाखो भाविकांना जन्मोत्सवाच्या शेवटच्या दिवशी १५१ क्विंटल पुरी, १०० क्विंटल वांगेभाजीचा महाप्रसाद वितरित करण्याची जबाबदारी परिसरातील ३०० गावांमधील चार हजार स्वयंसेवकांनी घेतली आहे, असेही गोरे यांनी सांगितले. -- विवेकानंद जन्मोत्सवाची तयारी पूर्ण विवेकानंद जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. ६ ते ८ जानेवारीदरम्यान साजरा होणाºया विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता शेवटच्या दिवशी सुमारे तीन लाख भाविकांना महाप्रसाद वितरणाने होणार महाप्रसाद तयार करणे ते वितरित करण्याची जबाबदारी हिवरा आश्रम गावासह परिसरातील ३०० गावांतील चार हजार स्वयंसेवकांनी स्वीकारली आहे.
विचार साहित्य संमेलन
हिवरा आश्रम येथील उत्सवादरम्यान विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बहुचर्चित विवेकानंद विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भगवतगीतेचे चिंतनकार तथा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी हे भूषविणार आहेत. तर उपाध्यक्ष अशोक थोरहाते हे स्वागताध्यक्ष आहेत. रामकृष्ण मठ, पुणेचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद हे संमेलनाचे उद्घाटक असून, ६ जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता या संमेलनाचे उद्घघाटन होणार आहे.