विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती कार्यक्रम

By admin | Published: August 31, 2016 01:21 AM2016-08-31T01:21:38+5:302016-08-31T01:21:38+5:30

देऊळगाव राजा नगर परिषदेच्यावतीने मतदार जगजागृती रॅली.

Voter awareness program by students | विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती कार्यक्रम

विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती कार्यक्रम

Next

देऊळगावराजा(जि. बुलडाणा), दि. ३0: नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक माहे डिसेंबर २0१६ मध्ये होत आहे. सदर निवडणूकी करीता मतदारांची नांव नोंदनी तसेच निवडणूकीमध्ये १00 टक्के मतदान करण्यासाठी मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम प्रभारी मुख्याधिकारी मदत जाधव यांच्या पुढाकाराने व श्री व्यंकटेश कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या सहकार्याने शहरातील मुख्य चौकात प थनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. १ जानेवारी १९९८ रोजी वयाचे १८ वर्ष पूर्ण करणार्‍या युवक व युवतीनी नांव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. ३१ ऑगस्ट पर्यंंत मतदार नांव नोंदणी करिता कार्यक्रम अखण्यात आलेला आहे. वयाचे १८ वर्ष पूर्ण करणारा कोणताही यवक किंवा युवती मतदाना पासून वंचित राहू नये, याकरिता निवडणूक आयोगाकडून वेळोवळी सुचना प्राप्त होत आहे. शहरात येणार्‍या नगर पालिका निवडणूका लक्षात घेता १ जानेवारी १९९८ रोजी वयाचे १८ वर्ष पूर्ण करणारे युवक युवती मतदान पासून वंचित राहु नये याकरीता प्रभारी मुख्याधिकारी मदन अशोक जाधव यांनी श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांंकडून पथनाट्या बसवून घेतले. त्यानंतर शहरातील मुख्य चौका-चौकात त्याचे सादरी करण करण्यात आले.

Web Title: Voter awareness program by students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.