बुलडाणा जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम

By admin | Published: September 20, 2016 12:14 AM2016-09-20T00:14:30+5:302016-09-20T00:14:30+5:30

१८ वर्षे पूर्ण झालेल्यांनी नाव नोंदविण्याचे शासनाद्वारे मतदारांना आवाहन करण्यात आले.

Voter Registration Campaign in Buldhana District | बुलडाणा जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम

बुलडाणा जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम

Next

मोताळा (जि. बुलडाणा), दि. १९: राज्य मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २0१७ या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार नोंदणीसाठी मतदार याद्यांचा विशेष कार्यक्रमास १६ सप्टेंबर २0१६ पासून सुरुवात झाली असून, ५ जानेवारी २0२७ पर्यंंत हा कार्यक्रम राबविल्या जाणार आहे. त्यामध्ये १ जानेवारी २0१७ रोजी ज्यांचे वय १८ वष्रे पूर्ण झाले आहे, अशा नवीन मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्याची मोहीम या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या विशेष कार्यक्रमांतर्गत १६ सप्टेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, १४ ऑक्टोबरपर्यंंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. ३0 सप्टेंबरपर्यंंत या यादीचा संबंधित भाग, ग्रामसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाचन करून, त्यातील नावांची खातरजमा करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबरपर्यंंत प्राप्त झालेले दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. १५ डिसेंबरपर्यंंत डेटाबेसचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. ५ जानेवारी २0१७ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली.

मतदार वाढण्यास मदत
जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी, मतदार यादी शुद्धीकरण मोहीम राबविली जाते. जिल्ह्यात होवून घालेल्या नगर परिषदेच्या निवडणूकीच्या अनुशंघाने नव मतदान नोंदणी मोहीम उपयुक्त ठरणार असून यातून जिल्ह्यात मतदार वाढण्यास मदत होणार आहे. या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

Web Title: Voter Registration Campaign in Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.