मतदारांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटीला उमेदवारांचे प्राधान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:26 AM2017-10-04T01:26:38+5:302017-10-04T01:27:41+5:30

Voters 'Door to Door' Prizes Prize! | मतदारांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटीला उमेदवारांचे प्राधान्य!

मतदारांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटीला उमेदवारांचे प्राधान्य!

Next
ठळक मुद्दे २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडादिवसेंदिवस चांगलाच तापू लागला आहेवर्चस्व राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष गाव पुढार्‍यांकडून जोरदार फिल्डिंग


अमोल ठाकरे। 
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडा दिवसेंदिवस चांगलाच तापू लागला आहे. यामध्ये काकनवाडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अविरोध झाले असून, दोन ग्रामपंचायतींकरिता सरपंचपदाकरिता अर्जच न आल्यामुळे दोन ग्रामपंचायती रिक्त राहणार असून, १८ सरपंच निवडले जाणार आहेत. यासाठी एकूण २६ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष गाव पुढार्‍यांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.
२१ ग्रामपंचायतींकरिता ग्रामपंचायत सदस्यांची संख्या १७३ एवढी असून, यापैकी ८२ सदस्य अविरोध झाले आहेत. तर ८७ सदस्यांचा जागाकरिता २0२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण २६ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १४ हजार ५७७ असून, स्त्री मतदारांची संख्या १२ हजार २२१ एवढी आहे. यावर्षी प्रथमच गावचे सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची, अटीतटीची होणार आहे. त्यामुळे संपूर्ण गावातील मतदारांची मर्जी सांभाळताना सरपंच पदासाठी बाशिंग बांधलेल्या इच्छुकांची चांगलीच दमछाक होत आहे. काही गावांमध्ये तर सख्खे काका-पुतणे हे सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. सरपंचपदी आपलीच निवड जनतेने करावी त्याकरिता इच्छुक उमेदवार घरोघरी जाऊन आश्‍वासनांची खैरात वाटत आहेत. आतापासूनच रंगीत, संगीत व ओल्या पाटर्य़ांची मेजवानी धुमधडाक्यात सुरू आहे; मात्र मतदार आपल्यालाच निवडून देणार की पराभवाचा धक्का देणार, या चिंतेने सरपंचपदासह सदस्य होण्याचे स्वप्न पाहणार्‍यांची झोप उडाल्याचे चित्र आहे. मतदानाच्या अंतिम तारखेपर्यंत मतदार राजाला आपलेसे कसा करता येईल, त्याचे मत आपल्याच पारड्यात कसे पाडून घेता येईल, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व सक्षम अशा तालुक्यातील १८ ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. यासाठी तगडी प्रचार यंत्रणा राबविण्यासह डोअर टू डोअर प्रचार करून मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

Web Title: Voters 'Door to Door' Prizes Prize!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.