आधार लिंकिंगकडे मतदारांची पाठ
By admin | Published: May 15, 2015 01:10 AM2015-05-15T01:10:35+5:302015-05-15T01:10:35+5:30
मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम; बुलडाणा जिल्ह्यात केवळ १४ हजार लिंकिंगचे काम.
बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंकिंग करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरू आहे; मात्र पुरेशा जनजागृतीअभावी हे काम थंड बस्त्यात असून, म तदारांनीच याकडे पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात मतदार ओळखपत्राशी आधार लिंकिंगचे काम केवळ १४ हजार ९१४ एवढेच झाले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंकिंग करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरू आहे; मात्र पुरेशा जनजागृतीअभावी मतदारांनी या मोहिमेला खो दिल्याचे दिसून येत आहे. मतदार याद्यातील घोळ, एकाच मतदाराचे दोन ते तीन ठिकाणी असलेले नाव, अशा विविध त्रुट्या दूर करून व एका मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार असावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रम आखला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकार्यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम जिल्हाभर राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे काम सुरू आहे. काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तर काही नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे; मात्र यात आधार कार्डशी लिंकिंग प्रक्रियेला विलंब होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात १८ लाख ७७ हजार ९३३ मतदार संख्या आहे; मात्र आतापर्यंत केवळ १४ हजार ९१४ एवढय़ाच मतदारांनी आधार कार्ड लिंकिंग केले आहे. यात मलकापूर मतदार संघात ८२६, बुलडाणा १७0८, चिखली १८0३, सिंदखेडराजा १९२३, मेहकर ३५७२, खामगाव ४२२४ तर जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात ८५९ मतदारांचा समावेश आहे. मतदारांचे छायाचित्र, मतदार ओळखपत्रातील माहिती व यूआयडीएआयची आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे असा मतदार याद्या शुद्धीकरणाचा उद्देश आहे. मतदार यादीतील दुबार नाव, मयत तसेच स्थलां तरित मतदारांची नावे वगळणे, छायाचित्रातील त्रुट्या दूर करून प्रमाणित मतदार यादी तयार करणे असाही या मोहिमेचा उद्देश आहे.