मतदारांना धमक्या; उमेदवारांची तक्रार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:29 AM2017-10-04T01:29:29+5:302017-10-04T01:30:12+5:30
नांदुरा : तालुक्यातील तरवाडी गट ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार मिनाबाई रमेश भाकरे यांनी विरोधक मतदारांना आमिषे दाखवित असल्याची तथा धमकावित असल्याची तक्रार तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी नांदुरा यांच्याकडे दाखल केली आहे.

तरवाडी गट ग्राम पंचायत अंतर्गत तरवाडी, पोटा, मोरवंड व कंडारी चार गावे येतात. येथील सरपंचपद नामाप्र स्त्री राखीव असून, येथे सरपंच पदासाठी ज्योती ओमराज कुटे, यमुना संतोष तायडे, विद्या गोपाळ तायडे, मिनाबाई रमेश भाकरे या चार महिला उमेदवार आहेत. यापैकी मिनाबाई रमेश भाकरे यांनी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे एक तक्रार अर्जान्वये गावात विरोधक मतदारांना धमकावित असल्याबाबत कळविले आहे. विरोधकांमुळे गावामध्ये दहशत निर्माण होत असून, निर्भयपणे मतदान होण्याची शक्यता नसून मतदार मतदानापासून दूर राहू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली आहे. तसेच तरवाडी ग्राम पंचायत बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून, येथील काही पोलिसांसोबत गावातील विरोधक मिळालेले असून, निवडणुकीदरम्यान तरवाडी येथे बोराखेडी व्यतिरिक्त इतर पोलीस स्टेशन कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमावे, अशी मागणीही सदर तक्रारीत करण्यात आली आहे.