बुलढाणा जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांसाठी मतदान सुरू; सकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाची गती संथ
By संदीप वानखेडे | Published: April 28, 2023 01:20 PM2023-04-28T13:20:14+5:302023-04-28T13:20:24+5:30
सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान हाेणार असून त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
बुलढाणा : जिल्ह्यातील दहापैकी पाच बाजार समित्यांच्या संचालकपदासाठी २८ एप्रिल राेजी सकाळी ८ वाजपासून मतदानास प्रारंभ झाला आहे़ सकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाची गती संथ असल्याचे चित्र हाेते़ बुलढाणासह मलकापूर, मेहकर, देउळगाव राजा आणि खामगाव बाजार समितीसाठी मतदान सुरू आहे.
मलकापूर बाजार समितीसाठी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत सहकार संस्था मतदार संघ २७़ ४५ टक्के, ग्रामपंचायत मतदार संघासाठी १५़ ७५ टक्के, व्यापारी/ अडते १४़ १५ टक्के तर हमाल मापारी मतदार संघासाठी ३१़ ५९ टक्के मतदान झाले आहे़ तसेच मेहकर बाजार समितीत सहकार संस्था मतदार संघात सकाळी ८ ते १० पर्यंत १९़ ३५ टक्के मतदान झाले़ गामपंचायत मतदार संघात ५़ ५८, व्यापारी अडते मतदार संघात २४़ ५३ तर हमाल, मापारीत मतदार ३५़ ५३ टक्के मतदान झाले हाेेते़ देउळगाव राजात मतदानाची गती संथ हाेती़
सहकारी संस्था मतदार संघात १०.३४ टक्के, ग्रामपंचायत मतदार संघ ५़ ६४ टक्के, हमाल मापारी मतदार संघासाठी १०़ ९५ टक्के मतदान झाले़ खामगाव बाजार समितीत सहकारी संस्थासाठी १८़ ७९ टक्के, ग्रामपंचायत मतदार संघासाठी १०़ ३३ टक्के, व्यापारी अडते १५़ ९७ टक्के आणि हमाल मापारीसाठी २१़ ०२ टक्के मतदान झाले़ बुलढाणा बाजार समितीच्या सहकारी संस्था मतदार संघासाठी १६़ ४१, ग्रामपंचायत मतदार संघासाठी ३़ ९० टक्के, व्यापारी अडते १९़ ४६ टक्के तर हमाल मापारीसाठी १४. ९० टक्के मतदान झाले आहे़ सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान हाेणार असून त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.