ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:31 AM2017-10-07T01:31:48+5:302017-10-07T01:32:27+5:30

बुलडाणा: जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतच्या निवडणुकांसाठी ७  ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यामध्ये २५७  सरपंच  पदासाठी तर १ हजार ५४२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ३ लाख  ६२ हजार ६८६ मतदार प्रत्यक्ष मतदान करणार आहेत.

Voting for Gram Panchayats today | ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

Next
ठळक मुद्दे३ लाख ६२ हजार ६८६ मतदार १,५४२ ग्रमपंचायत सदस्यांसाठी प्रत्यक्ष मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतच्या निवडणुकांसाठी ७  ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यामध्ये २५७  सरपंच  पदासाठी तर १ हजार ५४२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ३ लाख  ६२ हजार ६८६ मतदार प्रत्यक्ष मतदान करणार आहेत.
ग्रामीण भागातील राजकारणाचा केंद्रबिंदु समजल्या जाणार्‍या  ग्रामपंचायत निवडणुकांची अखेर वेळ आली आहे. जिल्ह्यातील  २७९ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होत असून,  यावर्षी पहिल्यांदाच सरपंच पद थेट जनतेतून निवडण्यात येणार  असल्याने सरपंच पदासाठी स्वतंत्र अर्ज भरण्यात आले आहेत.  ग्रामपंचायत सदस्य पदासाठीसुद्धा स्वतंत्र ऑनलाइन अर्ज  भरण्यात आले आहेत. जिल्ह्यात होणार्‍या ग्रामपंचायत  निवडणुकामध्ये एकूण ग्रामपंचायत सदस्य १ हजार ५४२   असून, २५७ सरपंच पदासाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडत  आहे. यामध्ये  बुलडाणा तालुक्यात १२ ग्रामपंचायतमधून ८६  ग्रामपंचायत सदस्य व ११ सरपंच पदासाठी मतदान होत आहे.  चिखली तालुक्यात २८ ग्रामपंचायती १४0 ग्रामपंचायत सदस्य व  २६ सरपंच पदासाठी मतदान होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात  ३0 ग्रामपंचायतमधून १४0 ग्रामपंचायत सदस्य व २९ सरपंच  पदासाठी मतदान होत आहे. देऊळगाव राजा तालुक्यात १९  ग्रामपंचायतींमधून ९५ ग्रामपंचायत सदस्य व १७ सरपंच  पदासाठी मतदान होत आहे. मेहकर तालुक्यात ५0 ग्रामपंचाय तींमधून २६६ ग्रामपंचायत सदस्य व ४४ सरपंच पदासाठी म तदान होत आहे. लोणार तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींमधून २७२  ग्रामपंचायत सदस्य व ३६ सरपंच पदासाठी मतदान होत आहे.  मलकापूर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींमधून ६७ ग्रामपंचायत  सदस्य व १0 सरपंच पदासाठी मतदान होत आहे. मोताळा तालु क्यात ११ ग्रामपंचायतींमधून ८९ ग्रामपंचायत सदस्य व ११ सर पंच पदासाठी मतदान होत आहे. नांदुरा तालुक्यात १३ ग्राम पंचायतींमधून ७६ ग्रामपंचायत सदस्य व १२ सरपंच पदासाठी म तदान होत आहे. खामगाव तालुक्यात १६ ग्रामपंचायतींमधून ७१  ग्रामपंचायत सदस्य व १५ सरपंच पदासाठी मतदान होत आहे.  शेगाव तालुक्यात १0 ग्रामपंचायतींमधून ४४ ग्रामपंचायत सदस्य  व १0 सरपंच पदासाठी मतदान होत आहे.  जळगाव जामोद  तालुक्यात १९ ग्रामपंचायतींमधून ६२ ग्रामपंचायत सदस्य व १८  सरपंच पदासाठी मतदान होत आहे. 
संग्रामपूर तालुक्यात २१ ग्रामपंचायतींमधून ८५ ग्रामपंचायत  सदस्य व १८ सरपंच पदासाठी मतदान होत आहे. ग्रामपंचायत  निवडणुकीमध्ये एकूण ३ लाख ६२ हजार ६८६ मतदारांचा  समावेश आहे.

मतदारांना मिळणार पगारी सुटी
जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतच्या ७ ऑक्टोबर रोजी  निवडणुका होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक  असलेल्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी  आपल्या कामाच्या ठिकाणावरून पगारी सुटी देण्यात येणार  आहे. तसेच मतदारांना योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न  झाल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्यास तशी तक्रारही  निवडणूक विभागाकडे मतदाराने केली तर संबंधितांवर  कार्यवाहीसुद्धा होऊ शकते.

५३ जागेवर एकही नामनिर्देशन नाही 
जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या सदस्य पदासाठी एकही नामनिर्देशन  पत्र प्राप्त झालेले नाही अशा एकूण ५३ जागांचा समावेश आहे.  त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात १, चिखली तालुक्यात ९,  देऊळगाव राजा तालुक्यात २, मेहकर तालुक्यात १४, मलकापूर  तालुक्यात २,  नांदुरा तालुक्यात २, खामगाव तालुक्यात ७,  शेगाव तालुक्यात ३, जळगाव जामोद तालुक्यात ९, संग्रामपूर  तालुक्यात ४  ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी एकही नामनिर्देशन  पत्र प्राप्त झालेले नाही.

Web Title: Voting for Gram Panchayats today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.