वडगाव गडवासीयांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 12:36 AM2017-05-17T00:36:42+5:302017-05-17T00:36:42+5:30

वडगाव गड : जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वडगाव गड गटग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा फटका वडगाव, हाशमपूर व इस्लामपूरसह परिसरातील वाड्या-वस्त्यांना बसत आहे.

Wadgaon Water Wand | वडगाव गडवासीयांची पाण्यासाठी भटकंती

वडगाव गडवासीयांची पाण्यासाठी भटकंती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडगाव गड : जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वडगाव गड गटग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा फटका वडगाव, हाशमपूर व इस्लामपूरसह परिसरातील वाड्या-वस्त्यांना बसत आहे.
सदर ग्रामपंचायतीच्या गावामध्ये आजपर्यंत कधी न बघितलेली पाणीटंचाई यावर्षी येथील जनता भोगत आहे. घरोघरी खासगी विहिरी खोदलेल्या आहेत; परंतु पाणी पातळी खोल गेल्यामुळे नागरिकांना खासगी विहिरी खोदणे अशक्य झाल्यामुळे संपूर्ण ग्रामवासीयांची मदार शासनाच्या पाणीटंचाई निवारणावर आहे ग्रामपंचायतीकडे ४३ हातपंप व सहा सार्वजनिक विहिरी उपलब्ध असून व भूतो न भविष्यती’ अशी पाणीटंचाई निर्माण झाली असताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा हेकेखोर स्वभावामुळे पाणीटंचाईचेही राजकारण करण्यात येत असून, गावातील जुन्या वस्तीमध्ये ग्रामपंचायतजवळील हातपंप तब्बल तीन महिन्यांपासून केवळ दुरुस्तीअभावी बंद पडले आहे. सदर हातपंपाला भरपूर पाणी असून, नादुरुस्तीमुळे सदर हातपंपाचे पाइप जंगल्यामुळे व त्याची कुंडी तुटल्याचे दुरुस्ती पथकाकडून पंधरा दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. सदर हातपंपाचा सिमेंट ओटा आजच तोडून कुंडी मोकळी करा उद्या येऊन नवीन कुंडी व पाइप हातपंपाच्या ओटा तेवढा खोदून पडलेला आहे. त्याचप्रमाणे गावातील अजूनही बरेचसे हातपंप बंद व नादुरुस्त अवस्थेत आहेत. केवळ एकच हातपंप असा आहे, की तो जर बंद पडला तर दुसऱ्याच दिवसी दुरुस्ती पथक येऊन पूर्ववत चालू करण्यात येतो, त्यामुळे ग्रामवासीयांकडून आपापल्या परीने पाणीटंचाईवर मात करण्यात येत असून, कुणी डोक्यावर, सायकलवर व कित्येक शेतकरी बैलगाडीने गावाबाहेरून पाणी आणत आहेत. तरी पाणीटंचाईवर राजकारण करणाऱ्या सदर ग्रामपंचायतच्या संबंधितांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेऊन कारवाई करण्याची तसेच येथील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी येथील त्रस्त नागरिकांकडून केल्या जात आहे.

Web Title: Wadgaon Water Wand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.