प्रतीक्षा संपली, ‘त्या’ २२ गावांचे सरपंचपद झाले निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:34 AM2021-03-05T04:34:27+5:302021-03-05T04:34:27+5:30
जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडल्यानंतर १८ जानेवारीला निकाल जाहीर झाले होेते. त्यानंतर ४९३ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच ...
जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडल्यानंतर १८ जानेवारीला निकाल जाहीर झाले होेते. त्यानंतर ४९३ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले होते. मात्र ३३ गावांतील सरपंचपदाचा फैसला आधीच्या काढण्यात आलेल्या आरक्षणामुळे होऊ शकला नव्हता. त्याअनुषंगाने ४ मार्च रोजी ३३ पैकी २२ गावांच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यासंदर्भातील सभा दुपारी १२ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, नायब तहसीलदार सुनील आहेर यांच्यासह संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत रुडी दाभेराव या सहा वर्षांच्या बालिकेच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.
- असे आहे सरपंच पदाचे आरक्षण-
नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार ओबीसी, माळेगाव गौड अनुसूचित जाती महिला, अलमपूर ओबीसी महिला, मोताळा तालुक्यातील पुन्हई एससी महिला, कोथळी एससी महिला, अंत्री ओबीसी, टाकळी वाघजाळ ओबीसी महिला, संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव ओबीसी महिला, पातुर्डा खुर्द ओबीसी महिला, रुधाना ओबीसी, तामगाव ओबीसी महिला, आलेवाडी एसटी महिला आणि महेकर तालुक्यातील आरेगाव एससी, तर मलकापूर तालुक्यातील वरखेड येथेही एससीचे आरक्षण सरपंचपदासाठी निघाले आहे.