१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग, दररोजचे १५० कॉल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:33+5:302021-04-22T04:35:33+5:30
--गंभीर रुग्णांना प्राधान्य-- एकादिवशी साधारणत: १४ ते १८ गंभीर रुग्णांना रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात येत आहे. कॉल्सची वाढती संख्या ...
--गंभीर रुग्णांना प्राधान्य--
एकादिवशी साधारणत: १४ ते १८ गंभीर रुग्णांना रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात येत आहे. कॉल्सची वाढती संख्या पाहता गंभीर रुग्णांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचे १०८ रुग्णवाहिका व्यवस्थापक डॉ. राजकुमार तायडे यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे आलेला कॉल अटेंड केल्यानंतर प्रथमत: बेड उपलब्ध आहेत का? याचा प्रथम माग काढावा लागतो. त्यानंतर रुग्णांना संबंधित ठिकाणी हलविण्यात येत आहे. बेड उपलब्ध नसल्यास रुग्णाला घेऊन सगळीकडेच फिरावे लागते. रुग्णवाहिकेतील रुग्णालाही अशा स्थितीत परत घरी जाता येत नाही आणि रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णवाहिकेत राहावे लागते. त्यामुळे बेड उपलब्धताही महत्त्वाची आहे.
--ग्रामीण भागातूनही कॉल्स--
जिल्ह्यात ग्रामीण भागातूनही कॉल्स येत असून, त्याचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी ही संख्याही वाढत आहे. दिवसाला जवळपास ६०च्या आसपास कॉल्स हे ग्रामीण भागातून असतात.
--अशी झाली रुग्ण वाहतूक--
जानेवारी :- ८७
फेब्रुवारी:- २८१
मार्च:- ६८७
(तीन महिन्यांत अपघात, विषबाधा, प्रसूती, अन्य वैद्यकीय कारणांवरून एकूण ११ हजार १२१ रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यात आले आहे.)