अंगणवाडी केंद्राना इमारतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:38 AM2021-08-13T04:38:57+5:302021-08-13T04:38:57+5:30
ग्रामीण भागात शाळा अथवा बालवाडी पर्यंत न पोहचणारी ही मुले आता अंगणवाडीत जाऊ लागली आहे. या बालकांना पोषक आहार ...
ग्रामीण भागात शाळा अथवा बालवाडी पर्यंत न पोहचणारी ही मुले आता अंगणवाडीत जाऊ लागली आहे. या बालकांना पोषक आहार या अंगणवाडीतून दिल्या जातो. परंतु, जिल्ह्यात चालवल्या जाणाऱ्या २ हजार ७१२ अंगणवाड्यांपैकी केवळ १ हजार ४५३ अंगणवाड्यांजवळ स्वतःची इमारत आहे. त्यामुळे उर्वरित इतर ठिकाणी भरणाऱ्या १ हजार २५९ अंगणवाड्या किती सुरक्षित आहेत, हा चर्चेचा विषय ठरतो. चिखली, बुलडाणा, खामगाव व संग्रामपूर या भागातील बहुतांश अंगणवाड्या या इमारतीविनाच भरत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्वतंत्र इमारतीत भराव्यात, यासाठी नियोजन समितीच्या बैठकीतही निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी काही अंगणवाड्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे, तर काहींची निविदा प्रक्रियाच अद्याप पूर्ण होणे बाकी असल्याची माहिती आहे.