बसफेऱ्या सुरू करण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:33 AM2021-03-20T04:33:57+5:302021-03-20T04:33:57+5:30
सर्क्यूलर रोडचे काम अपूर्णच बुलडाणा : शहरातील सर्क्यूलर रोडचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या रस्त्याचे काम अपूर्णच ...
सर्क्यूलर रोडचे काम अपूर्णच
बुलडाणा : शहरातील सर्क्यूलर रोडचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या रस्त्याचे काम अपूर्णच असल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यावरून जड वाहने प्रवेश करीत आहेत त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
पाणीपुरवठ्याचा प्रश्न
बुलडाणा : तालुक्यातील भादाेला, माळविहीर भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, याकरिता अनेक ठिकाणी नळयोजना आहे. त्यामुळे पारंपरिक जलस्रोत असलेल्या विहिरी दुर्लक्षित राहिल्या आहेत. काही गावात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
मुख्यालयाची अॅलर्जी
बुलडाणा : तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालये दुर्लक्षित झाली आहेत. तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची अॅलर्जी असल्याने विविध कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या शोधात फिरावे लागत आहे. वेळेवर कागदपत्र मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.
शौचालयाचे बांधकाम कासवगतीने
बुलडाणा : स्वच्छ भारत अभियानातून शौचालयाचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र तालुक्यात शौचालयाचे बांधकाम कासवगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. बेसलाइन सर्वेक्षणानुसार या कामाला प्राधान्य देण्याची गरज आहे.
एटीएम सेवा वारंवार विस्कळीत
बुलडाणा : येथील भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक व बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ इंडिया या शाखेची एटीएम सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. याचा अनेक ग्राहकांना त्रास होत आहे. अनेकवेळा तर एटीएममध्ये पैसेच नसतात. त्यामुळे ग्राहकांना दुसऱ्या शाखेच्या एटीएममधून पैसे काढावे लागतात.
मोबाइल चोरीच्या घटनेत वाढ
बुलडाणा : गत काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आता मोबाइल चोरीकडे अज्ञात चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. मोबाइल चोरी केल्यानंतर शहराच्या ठिकाणी मोठ्या दुकानात त्याची विक्री केली जाते.