नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:22 AM2021-06-21T04:22:44+5:302021-06-21T04:22:44+5:30
गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळेत माेफत प्रवेश द्या बुलडाणा : काेराेनाच्या काळात गरीब विद्यार्थ्यांकडून कुठलीही फी न घेता माेफत प्रवेश ...
गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळेत माेफत प्रवेश द्या
बुलडाणा : काेराेनाच्या काळात गरीब विद्यार्थ्यांकडून कुठलीही फी न घेता माेफत प्रवेश देण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदाेलन करण्याचा इशारा राणा चंदन यांनी दिला आहे.
मलगी फाट्यावर गतिराेधक बसवा
बुलडाणा : चिखली तालुक्यातील मलगी फाट्यावर गतिराेधक बसविण्याची मागणी निवृत्ती भानुदास पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या मार्गावर माेठ्या प्रमाणात वाहतूक असते.
क्रीडा अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ
बुलडाणा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या हस्ते विमाेचन करण्यात आले.
सुंदरखेड येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा
बुलडाणा : तालुक्यातील सुंदरखेड येथे पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आला आहे. सुंदरखेड येथील १३ हजार ३१७ लोकसंख्येकरिता एक टँकर मंजूर करण्यात आला आहे.
पीक कर्जवाटपाची गती वाढविण्याची गरज
बुलडाणा : खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला असतानाच पीक कर्जवाटपाची गती तुलनेने संथ असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरापासून दुष्काळाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीसाठीचे बी-बियाणे खरेदीसाठी सध्या पैशाची गरज आहे.
म्युकरमायकोसिस जनजागृतीची गरज
बुलडाणा : कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांवर ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराने हल्ला चढविला आहे. म्युकरमायकोसिसवर नियंत्रण गरजेचे असून, या आजाराच्या प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे.
त्या कुटुंबांचा कर माफ करा
सिंदखेडराजा : कोरोना संसर्गाने गृहप्रमुख गमावलेल्या कुटुंबांचा कर पालिकेने माफ करावा, अशी मागणी शहर काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाने शहरात अनेकांचा मृत्यू झाला. ज्यांच्यावर घराची मदार आहे, असे कर्तेपुरुषही मरण पावले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.
शेतमोजणी अहवालासाठी शेतकऱ्यांची धावपळ
डोणगाव : कऱ्हाळवाडी शिवारातील शेतीची मोजणी होऊन जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्याला शेतमोजणीचा अहवाल मिळालेला नाही. भूमी अभिलेख कार्यालयातून शेतमोजणीचा अहवाल मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कोरोनामुक्त गाव स्पर्धेकडे लक्ष
बुलडाणा : ग्रामीण भागात कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील यशस्वी गावांना निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष कोरोनामुक्त गाव स्पर्धेकडे लागले आहे.
सोयाबीन बियाणांची कृत्रिम टंचाई!
धाड : बुलडाणा तालुक्यात यावर्षी ५६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. यावर्षी कृषी आणि बियाणे महामंडळाच्या दुर्लक्षित कारभाराने तालुक्यात सोयाबीन बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली असल्याचे चित्र आहे.
आंतरपिकावर धामणगावातील शेतकऱ्यांचा भर
धामणगाव धाड : परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरूच्या बागेत आंतरपीक म्हणून मल्चिंग पेपरवर ठिबक सिंचनाद्वारे मिरचीची लागवड केली आहे. सध्या मिरचीचे पीक बहरले आहे.