फेरीवाल्यांना मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:04 AM2021-03-04T05:04:17+5:302021-03-04T05:04:17+5:30
बस फेरीअभावी प्रवासी त्रस्त लोणार : तालुक्यातील खुरमपूर येथील बसफेरी नियमित सुरू करण्याची मागणी सरपंच रेश्मा राठोड व सामाजिक ...
बस फेरीअभावी प्रवासी त्रस्त
लोणार : तालुक्यातील खुरमपूर येथील बसफेरी नियमित सुरू करण्याची मागणी सरपंच रेश्मा राठोड व सामाजिक कार्यकर्ते समाधान राठोड यांनी आगार व्यवस्थापकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमाेड
हिवरा आश्रम : मेहकर तालुक्यातील दुधा - ब्रम्हपुरी येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री. ओलांडेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, परिसरातील भाविकांचा हिरमाेड झाला आहे. या यात्रामहाेत्सवासाठी विदर्भासह मराठवाड्यातील भाविक येत असतात.
रस्त्यावरील धुळीमुळे पिकांना फटका
दुसरबीड : तढेगाव फाटा ते देऊळगावमही रोडवरील समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांना धुळीचा फटका बसत आहे. त्यामुळे तूरपिकाचे नुकसान होत आहे.
अल्पवयीन मुलांकडे दुचाकींची चावी
जानेफळ : अल्पवयीन मुलांमध्ये दुचाकी चालविण्याची क्रेझ वाढल्याने आणि पालकांकडूनसुद्धा मोकळीक मिळत असल्याचे चित्र जानेफळ परिसरात आहे. अल्पवयीन मुले सुसाट वाहने चालवत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाेलिसांनी अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंदच!
साखरखेर्डा : अनलाॅक प्रक्रियेंतर्गत बस सेवा सुरू हाेऊन तीन महिने झाले असले तरी ग्रामीण भागात अजूनही बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही. मेहकर आगार प्रमुखाने केवळ लांब पल्ल्याच्या बसेस सुरू केल्या असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना ॲटोरिक्षा किंवा काळीपिवळी टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. त्यातही एसटी बसपेक्षा दुप्पट भाडे आकारले जात आहे. याची दखल घेऊन ग्रामीण भागात एसटी बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
संत्रा उत्पादन ३० टनापर्यंत
बुलडाणा : जिल्ह्यात संत्र्याचे लागवड क्षेत्र ४ हजार ४०० हेक्टर असून, त्यामध्ये ३० टनाच्या आसपास उत्पादन होते. कोल्ड स्टोरेजची सुविधा केवळ नांदुरा येथे आहे. सध्या संत्रीला ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक अडचणीत आहेत.
२५ हजार शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत
सिंदखेड राजा : तालुक्यातील १०५ गावांची आणेवारी ४८ पैसे आहे. तरीही तालुक्यातील २५ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. तालुक्यात साेयाबीन आणि कपाशीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.