जिल्ह्यात पुन्हा पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:21+5:302021-08-27T04:37:21+5:30
उडीद-मूग तोडणीला बुलडाणा : जिल्ह्यात अत्यल्प हेक्टरावरच उडीद-मुुगाची पेरणी झाली आहे. मात्र, आहे तो उडीद-मूग सध्या तोडणीला आला असून, ...
उडीद-मूग तोडणीला
बुलडाणा : जिल्ह्यात अत्यल्प हेक्टरावरच उडीद-मुुगाची पेरणी झाली आहे. मात्र, आहे तो उडीद-मूग सध्या तोडणीला आला असून, शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पीक घरी आणण्यासाठी लागणारे मजूरही कमी प्रमाणात असून, यामुळे अधिक मजुरी देऊन मजुरांना शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मध्येच पाऊस बरसल्यास हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता आहे.
काटेरी झुडपांचा विळखा
उंद्री : उंद्री ते वडाळी जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे असल्याने वाहन चालकांना गाडी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेक अपघातही झालेले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तरी आता पावसाची उघडीप असून, संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपे कापावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.