आरटीई प्रवेशाच्या दुसरी यादीची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 03:20 PM2019-06-04T15:20:34+5:302019-06-04T15:20:43+5:30

एकीकडे शाळा सुरु होण्यास आठवड्याचा कालावधी उरला असताना अद्याप दुसरी यादी जाहिर न झाल्याने पालकांच्या पाल्यांच्या शाळा प्रवेशाची चिंता लागली आ

Waiting for second list of RTE access! | आरटीई प्रवेशाच्या दुसरी यादीची प्रतीक्षा!

आरटीई प्रवेशाच्या दुसरी यादीची प्रतीक्षा!

googlenewsNext

- योगेश फरपट

खामगाव : आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाच्या दुसरी यादीची पालकांना प्रतिक्षा लागली आहे. एकीकडे शाळा सुरु होण्यास आठवड्याचा कालावधी उरला असताना अद्याप दुसरी यादी जाहिर न झाल्याने पालकांच्या पाल्यांच्या शाळा प्रवेशाची चिंता लागली आहे. शिक्षण विभागाकडून होत असलेल्या दिरंगाईचा फटका पालकांना बसत असल्याचे वास्तव आहे.
आर्थीक व दुर्बल घटकातील पाल्यांना इंग्रजी शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व शाळांमध्ये २५ ट्कके प्रवेश या प्रवर्गासाठी राखीव आहे. आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया ही शाळा सुरु होण्यापूर्वी पुर्ण करणे क्रमप्राप्त आहे. मात्र शिक्षण विभागाकडून सुुुरु असलेल्या दिरंगाईमुळे अद्याप आर.टी.ई. प्रवेशाची केवळ पहिली यादीच जाहिर झाली आहे. एक महिना उलटला तरी अद्याप दुसरी यादी जाहिर करण्यास विलंब होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील २२० शाळांनी आर.टी.ई. अंतर्गत नोंदणी केली होती. त्यामध्ये २९२९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. ५३२५ विद्यार्थ्यांनी आर.टी.ई. प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. ्त्यापैकी पहिल्या यादीत १६०९ विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून त्यापैकी ११४३ विद्यार्र्थ्यांनी निवड झालेल्या शाळेमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. गत वर्षी मे अखेर आर.टी.ई. प्रवेशाची सर्व प्रक्रिया पुर्ण झाली होती. यावर्षी मात्र जून सुरु झाला तरी अद्याप पहिली यादीच जाहिर होवू शकली. दुसऱ्या यादीची अद्याप प्रतिक्षाच आहे.
पालकांना धरले जात आहे वेठीस!
ज्या पालकांची मुले के.जी. २ मध्ये एखाद्या शाळेत आहेत. त्या शालेय व्यवस्थापनाकडून पहिल्या वर्गातील प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांना वारंवार फोन करून वेठीस धरल्या जात असल्याचेही प्रकार शहरात घडत आहेत. आरटीई नंबर लागला नाहीतर प्रवेश मिळणार की नाही याबाबत पालकांना साशंकता निर्माण झाली आहे.
प्रशासकीय दप्तर दिरंगाई
शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे यावर्षी आरटीई प्रवेशाचे नियोजन चुकल्याचे दिसून येते. शालेय व्यवस्थापनावर शिक्षण विभागाचा कोणताही अंकूश नसल्याने प्रवेशाची प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. त्यामुळे दुसरी यादी लागण्यास विलंब होत असल्याची माहिती शिक्षण विभागातून मिळाली आहे.

आर.टी.ई. प्रवेशासाठी अर्ज केला आहे. मात्र पहिल्या यादीत मुलाचा नंबर लागला नाही. त्यामुळे दुसºया यादीची प्रतिक्षा आहे. कुणी काही सांगायला तयार नाही.
- सतीश चोपडे, पालक


ही सर्व प्रक्रिया जिल्हा स्तरावरून होते. यामध्ये सर्व काही नियमानुसार होत आहे. पालकांनी थोडा धीर धरावा.
- गजानन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, खामगाव

Web Title: Waiting for second list of RTE access!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.