२०० जणांच्या काेराेना चाचणी अहवालांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:41+5:302021-05-11T04:36:41+5:30
पिंपळगाव सराई : रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोनशे नागरिकांचे आरपीटीपीसीआर अहवाल बारा दिवसानंतर ही प्रलंबित असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, ...
पिंपळगाव सराई : रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोनशे नागरिकांचे आरपीटीपीसीआर अहवाल बारा दिवसानंतर ही प्रलंबित असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, परिसरात काेराेना संक्रमण वाढण्याची शक्यता आहे़ रायपूर पाेलीस ठाण्यातील ३६ कर्मचाऱ्यांचे अहवालही मिळाले नाहीत़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे़
बुलढाणा तालुक्यातील रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जवळपास दोनशे नागरिकांचे काेराेना आरटीपीसीआर रिपोर्ट बारा दिवस झाले तरीसुद्धा मिळाले नाहीत़ रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २८ एप्रिलपासून नागरिकांचे आरटीपीसीआर तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत़ तेव्हापासून अजूनही अहवाल आले नसल्याने चित्र आहे़ परिसरात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ त्यातच अहवाल विलंबाने येत असल्याने अनेक जण गावात फिरत आहेत़ गावात फिरल्यानंतर त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त हाते आहे़ यपुर प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने अहवाल येण्यास बराच विलंब हाेत आहे़ तसेच रुग्णांची हेळसांड हाेत आहे़ याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्रलंबित असलेले अहवाल देण्याची मागणी हाेत आहे़
बुलडाणा जिल्ह्याला आरटीपीसीआर तपासणी लॅब एकच आहे़ त्या ठिकाणी तपासणी करणारे कर्मचारी कमी असल्यामुळे आरटीपीसीआरचे अहवाल येण्यास विलंब हाेत आहे़ डाॅ़ प्रशांत बढे, तालुका वैद्यकीय अधिकारी बुलडाणा