वाकी बु. येथील पाणीपुरवठा १५ दिवसांपासून खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:21 AM2021-07-05T04:21:55+5:302021-07-05T04:21:55+5:30
गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीची पाणी कर वसुली ९० टक्के केलेली आहे. तरीसुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरण कंपनीचा विद्युत देयकाचा भरणा केलेला नाही. ...
गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीची पाणी कर वसुली ९० टक्के केलेली आहे. तरीसुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरण कंपनीचा विद्युत देयकाचा भरणा केलेला नाही. संबंधित जे. ई. अतार, अभियंता, देऊळगाव मही यांच्याशी संपर्क साधला असता वाकी बुद्रुक ग्रामपंचायतीने आठ ते दहा लाख रुपये बिल थकले आहे, त्यामुळे पाणीपुरवठा खंडित असल्याचे सांगितले.
नागरिकांची पाण्यासाठी धावपळ
अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्याने गावचा पाणीपुरवठाही खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ होत आहे. नागरिकांना एक किलोमीटरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन पाणी कर वसुली काटेकोरपणे करते, अशी गावकऱ्यांची ओरड आहे.
आणखी किती दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणार?
आणखी किती दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणार? असा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत. तरी ग्रामपंचायतीकडून संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व तीन दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. न केल्यास गावकऱ्यांच्या वतीने पंचायत समिती, देऊळगाव राजा येथे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.