मेहकरमध्ये वंचितांची दिवाळी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:13 AM2017-10-16T01:13:58+5:302017-10-16T01:14:55+5:30
मेहकर : येथे आई, वडील नसलेल्या १४४ मुला-मुलींना दिवाळीनिमित्त आवश्यक वस्तू भेट देऊन वंचितांची दिवाळी साजरी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : येथे आई, वडील नसलेल्या १४४ मुला-मुलींना दिवाळीनिमित्त आवश्यक वस्तू भेट देऊन वंचितांची दिवाळी साजरी करण्यात आली.
मेहकर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या संकल्पनेतून व साहित्यिक किरण डोंगरदिवे यांच्या नियोजनातून मेहकरमधील अगदी मोजक्याच लोकांना संपर्क करून त्यांच्याकडून त्यांच्या स्वेच्छेतून मिळेल ती मदत स्वीकारून मेहकर शहरातील सर्व शाळांमधील आई-वडील नसलेल्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंंत एकूण १४४ मुला-मुलींना एक नवीन ड्रेस, त्याला आवडेल ती चप्पल, बुट, पाच रजिस्टर, पाच पेन, चित्रकला वही, रंगकांडी बॉक्स, कंपासपेटी अशा साहित्यासह फ्रेंड्स क्लब मेहकर या महिला गटाच्यावतीने दोन किलो दिवाळी फराळ याचे वाटप करून खर्या अर्थाने वंचितांची दिवाळी साजरी करण्यात आली. मदत करीत असताना आपले नाव कोठेही येऊ नये, असे सांगणारे डॉक्टर्स, व्यापारी आणि अधिकारी यांच्या मोठय़ा मनाच्या उदारतेतून हा कार्यक्रम पार पडला. किरण डोंगरदिवे आणि मी निमित्तमात्र आहोत, असे गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार संतोष काकडे, गटशिक्षणाधिकारी पागोरे, आहार अधिकारी विखे, किरण डोंगरदिवे यांनी विचार व्यक्त केले. यशस्वीतेसाठी अंकुश गवई, धनंजय जुमडे आदींसह गटसाधन केंद्राच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.