विकासासाठी वार्ड पद्धतच योग्य

By admin | Published: December 25, 2014 11:50 PM2014-12-25T23:50:55+5:302014-12-25T23:50:55+5:30

प्रभाग नकोच : लोकमत परिचर्चेतून नगरसेवकांचा सूर.

Ward method for development is right | विकासासाठी वार्ड पद्धतच योग्य

विकासासाठी वार्ड पद्धतच योग्य

Next

बुलडाणा : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रभाग पद्धती बंद करून पुन्हा एकदा वार्ड पद्धत सुरू करण्याची तयारी भाजप सरकारने सुरू केली आहे. वार्ड पद्धतीमुळे पालिकांच्या निवडणुकीत होणारा अव्वाच्या सव्वा खर्च थोपविता येणार असून, ही पद्धत राजकीय पक्षाच्या सोयीची असली तरी नागरिकांच्या तसेच नगरसेवकांच्या दृष्टीने गैरसोयीची असल्यामुळे वार्ड पद्धतच योग्य आहे, असा सूर लोकमतने आज घेतलेल्या परिचर्चेतून निघाला. दरम्यान, वार्डनिहाय निवडणुका घेतल्यास नगराध्यक्ष जनतेतून निवडावा, अशा सूचनाही काही नगरसेवकांनी मांडल्या. सन २00१ पर्यंंत राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका वार्ड पद्धतीने घेण्यात येत होत्या; २00१ मध्ये शासनाने प्रभाग पद्धती सुरू केली. त्यावेळी तीन वार्डांंचा मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला, त्यामुळे स्वाभाविकच एका प्रभागाचे प्रतिनिधीत्व तीन नगरसेवक करीत होते. सन २00६ मध्ये पुन्हा शासनाने प्रभाग पद्धती बंद करून वार्ड पद्धतीनुसारच पालिकेच्या निवडणुका घेतल्या; परंतु सन २0११ च्या नगरपालिका निवडणुकीत तत्कालीन कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने पुन्हा एकदा प्रभाग पद्धत सुरू केली. यावेळी एका प्रभागातील मतदारांना चार नगरसेवक निवडण्याचा अधिकार बहाल करण्यात आला होता; आता पुन्हा राज्यात नव्याने सत्तारूढ झालेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने प्रभाग पद्धतीला मूठमाती देऊन वार्ड पद्धत सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे नगरपालिकांच्या आगामी निवडणुका वार्ड पद्धतीनेच होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ११ नगरपालिका आहेत, तर मोताळा आणि संग्रामपूर या दोन नगर पंचायती प्रस्तावित आहेत.
नगरसेवक संजय गायकवाड , राजू काटीकर, दत्ता काकस, हेमंत खेडेकर, मो. सज्जाद व भाजप शहर अध्यक्ष अँड.अमोल बल्लाळ या परिचर्चेत सहभागी झाले होते.

Web Title: Ward method for development is right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.