विविध मागण्यांसाठी रयत क्रांतीचा आंदाेलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:07+5:302021-05-23T04:34:07+5:30
आतापर्यंत झालेल्या कर्जमाफीमध्ये लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत थकित कर्जमाफी करण्यात यावी व तत्काळ पीककर्ज देण्यात यावे. छोटे ...
आतापर्यंत झालेल्या कर्जमाफीमध्ये लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत थकित कर्जमाफी करण्यात यावी व तत्काळ पीककर्ज देण्यात यावे.
छोटे उद्योजक व व्यावसायिक यांना प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत करण्यात यावी.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळावा. कोरोना रुग्णांना सरसकट महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळावा व पात्र रुग्णांचे पैसे ज्या हॉस्पिटलने घेतले असतील ते पैसे रुग्णांना परत मिळवण्याचे आदेश व्हावेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज माफी मिळावी आदींसह इतर मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला. यावेळी उपस्थित जितू अडेलकर राज्य प्रवक्ता, बाळासाहेब गवई जिल्हा उपाध्यक्ष, महेश काळे तालुका अध्यक्ष, राज आखरे युवा अध्यक्ष ,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.