जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:35 AM2021-04-16T04:35:08+5:302021-04-16T04:35:08+5:30
शेतमाल सुरक्षित ठेवा अवकाळी पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी कापणी व मळणी केलेला माल शेतकऱ्यांनी सुरक्षितस्थळी लावून ठेवावा. साठवणुकीची व्यवस्था ...
शेतमाल सुरक्षित ठेवा
अवकाळी पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी कापणी व मळणी केलेला माल शेतकऱ्यांनी सुरक्षितस्थळी लावून ठेवावा. साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक शीटने झाकून ठेवावा. सोबतच फळझाडांना बांबूचा आधार द्यावा, तसेच शेतकऱ्यांनी स्वत:ची व गुरांची योग्य काळजी या कालावधीत घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राने केले आहे.
आठ तालुक्यांत झाला पाऊस
बुधवारीही जिल्ह्यातील आठ तालुक्यांत तुरळक स्वरूपात अवकाळी पाऊस झाला. यामध्ये चिखली तालुक्यात सर्वाधिक २.५ मि.मी. पाऊस झाला असून, त्या खालोखाल सिंदखेडराजा येथे २.१ मि.मी., खामगाव आणि शेगाव तालुक्यांत प्रत्येकी १.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त देऊळगावराजा, मेहकर तालुक्यातही १ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा व नांदुरा तालुक्यांत त्यातुलनेत अल्प प्रमाणात हा पाऊस पडला आहे.
३६ वर्षांपासून अवकाळी पावसाची नोंद
बुलडाणा जिल्ह्यात उन्हाळ्यात मार्च ते मे महिन्यादरम्यान अवकाळी पाऊस होत असल्याची महसूल दप्तरी नोंद आहे. जवळपास १९८५ पासून या नोंदी आहेत. त्यामुळे आता खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांनाही शेतीमशागतीला प्रारंभ करण्याची गरज निर्माण झाली आहे.