कलावंत मानधन समितीसाठी युवा स्वाभिमानचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:39+5:302021-07-19T04:22:39+5:30

स्थानिक शासकीय विश्रामगृहात १६ जुलै रोजी कलावंतांच्यावतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. वृध्द कलावंत मानधन ...

Warning of youth self-esteem movement for artist honorarium committee | कलावंत मानधन समितीसाठी युवा स्वाभिमानचा आंदोलनाचा इशारा

कलावंत मानधन समितीसाठी युवा स्वाभिमानचा आंदोलनाचा इशारा

Next

स्थानिक शासकीय विश्रामगृहात १६ जुलै रोजी कलावंतांच्यावतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. वृध्द कलावंत मानधन समिती गठित करून वृध्द कलावंतांना तात्काळ मानधन देण्यात यावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी चर्चासत्र पार पडले. गेल्या दोन ते तीन वर्षांचे कलावंतांचे अर्ज शासनदरबारी धूळ खात पडून आहेत. त्यामुळे कलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे.

कोरोनामुळे कलावंतांचे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. युवा स्वाभिमान पार्टीने याची दखल घेत प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे १५ दिवसांमधे समिती गठित झाली नाही, तर यलवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने पालकमंत्र्यांच्या घरासमोर भजन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी श्रीराम परिहार, शंकर मोरे, स्वप्नील शिंगणे, आत्माराम गायकवाड, दामू अण्णा इंगळे, किसन चव्हाण, गजानन झगडे, शंकरसिंग मोरे, गुलाबराव सोलंकी, भरत इंगळे, अरुण शिंगणे, रमेश पाटील, किरणसिंह ठाकूर, सुगदेव झाडे, रमेश गायकवाड, महेश पंडित, गणेश सुरसे, ज्ञानेश्वर शिंगणे, दामोदर पिंपळे, गणेश सपकाळ यांची उपस्थिती होती.

वृद्ध कलावंतांच्या विविध समस्यांवर रंगली चर्चा

आजपर्यंत बुलडाणा येथील वृध्द कलावंत मानधन समितीमध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आले नाही. म्हणून नवीन समितीमध्ये महिलांनाही स्थान देण्यात यावे, अशी मागणीही या चर्चासत्रामध्ये करण्यात आली. तसेच यावेळी वृद्ध कलावंतांच्या विविध समस्यांवर चर्चा रंगली.

Web Title: Warning of youth self-esteem movement for artist honorarium committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.