व्हॉल्व लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय

By admin | Published: September 7, 2014 12:26 AM2014-09-07T00:26:12+5:302014-09-07T00:26:12+5:30

खामगाव येथे व्हॉल्व लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय

Waste dissipation due to valve leakage | व्हॉल्व लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय

व्हॉल्व लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय

Next

खामगाव : स्थानिक गजानन कॉलनी रोडवरील मुख्य पाईपलाईन लिकेज झाल्याने ५ सप्टेंबर रोजी दिवसभर पाण्याचा अपव्यय झाला आहे. तर दुसरीकडे पाणी मिळण्यासाठी नागरिकांना मात्र वाट पाहावी लागते.
खामगाव शहराची जवळपास ९५ हजारापर्यंत लोकसंख्या आहे. या नागरिकांना पाणीपुरवठय़ाची सोय नगर परिषदेने केली आहे. शहरातील पाणी पुरवठय़ाची वितरण व्यवस्था ही १00 वर्ष जुनीच असल्याने अनेक तांत्रिक अडचणी येतात. शहराला ज्ञानगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या १५ दिवसांअगोदर पावसामुळे पूर येऊन सारोळा गावाजवळ पाईपलाईन फुटली होती. यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. नंतर नगर परिषदने युद्धपातळीवर प्रयत्न करून पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. दोन-तीन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू असताना गजानन कॉलनी रोडवरील पत्रकार भवनाजवळ वामन नगर टाकीला जोडलेल्या मुख्य पाईपलाईनवरूनच व्हॉल लिकेज झाल्याने ५ सप्टेंबर रोजी दिवसभर या व्हॉलमधून पाण्याचे कारंजे उडून पाण्याचा अपव्यय झाला. यामुळे समोरच्या भागात पाणी पुरवठा प्रभावित झाला.
वारंवार पाईपलाईनमध्ये लिकेज होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे पाण्याचा तर अपव्यय होत आहेच; मात्र यामुळे नागरीकांना वेळेवर पाणी मिळत नाही.
या संदर्भात पाईपलाईनची कायमस्वरूपी दुरुस्ती करून वारंवार होणारे असे प्रकार थांबावेत, अशी मागणी शहरवासीयाकडून होत आहे. दरम्यान नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय मोकासरे यांनी व्हॉल लिकेज असल्यास तत्काळ त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

Web Title: Waste dissipation due to valve leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.