दारू,पैशाच्या वाटपावर यंत्रणेचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:38+5:302020-12-24T04:29:38+5:30
सिंदखेड राजा: तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यासाठी प्रशासन सज्ज झाले असले तरीही ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये वाद नित्याचेच ...
सिंदखेड राजा: तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यासाठी प्रशासन सज्ज झाले असले तरीही ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये वाद नित्याचेच आहेत. विशेष करून अवैध दारू,पैशांचे असिमित वाटप हे प्रकार वादाला कारणीभूत असतात. याला आळा घालण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली असून, यासाठी महसूल कर्मचारी, पोलीस आणि एक्साईस विभागाची मदत घेतली जाणार आहे.
नगर परिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीत धाब्यांवरील पार्ट्या, दारू आणि पैशांचे वाटप हे अवैध प्रकार सर्रास सुरू असतात. अर्थात केवळ याच निवडणुकांमध्ये हे प्रकार होतात असे नाही, तर विधानसभा, विधान परिषद या निवडणुकांमध्येही उमेदवाराच्या स्टेटसनुसार या अवैध प्रकाराला खतपाणी घातले जाते, हे नुकत्याच झालेल्या पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणुकीत दिसून आले. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत या प्रकारांना आळा बसावा, यासाठी तहसील प्रशासन सज्ज झाले आहे. तिन्ही यंत्रणेत समन्वय ठेवून निवडणुकीत अनुचित प्रकार थांबविण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार प्रवीण लटके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.