पुलासह बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाला गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 06:38 PM2019-07-12T18:38:50+5:302019-07-12T18:41:37+5:30

पहिल्याच पावसात या पूलासह बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून जलसंधारणाला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात पहिलाच पुलासह बंधारा बांधण्याच्या उद्देशाचे फलित झाल्याचे दिसून येते.

Water conservation cceleration due to bridges with dam | पुलासह बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाला गती!

पुलासह बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाला गती!

Next
ठळक मुद्देकाथरगाव येथे उभारण्यात आलेल्या पुलासह बंधाºयाला प्रत्येकी ६ मीटरचे ५ गाळे आहेत. या बंधाºयात पहिल्याच पावसात मोठ्याप्रमाणात पाण्याची साठवणूक झाली. सिंचन आणि पिण्याचे किंवा उद्योगाच्या हेतूसाठी या पाण्याचा उपयोग होवू शकतो.

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे जतन आणि वाहतूक अशा तिहेरी उद्देशाने संग्रामपूर तालुक्यातील  काथरगाव येथे पहिलाच पुलासह बंधारा बांधण्यात आला. पहिल्याच पावसात या पूलासह बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून जलसंधारणाला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात पहिलाच पुलासह बंधारा बांधण्याच्या उद्देशाचे फलित झाल्याचे दिसून येते.
 खालावलेली जलपातळी वाढविण्यासाठी तसेच पाणलोट व्यवस्थापनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील पूलासह बंधाºयाच्या धर्तीवर काथरगाव पूल (तालुका संग्रामपूर) येथे पहिलाच पुलासह बंधारा उभारण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोदतंर्गत या बंधाºयाचे एका महिन्याच्या कालावधीत विक्रमी वेळेत बांधकाम पूर्णत्वास नेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अमरावती विभागातील पहिलाच पुलासह बंधारा काथरगाव येथे बांधण्यात आला. या बंधाºयात पहिल्याच पावसात मोठ्याप्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून, काथरगाव येथील नागरिकांना दळणवळणाचीही सुविधाही निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल थोटांगे, जळगाव जामोदचे उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनात या पुलासह बंधाºयाचे बांधकाम तडीस नेण्यात आले.

 


अशी आहे पुलासह बंधाºयाची रचना!
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथे उभारण्यात आलेल्या पुलासह बंधाºयाला प्रत्येकी ६ मीटरचे ५ गाळे आहेत. पुलाची लांबी ३० मीटर असून, बंधाºयाची उंची २ मीटर आहे. तर राफट फाउंडेशन पध्दतीने पायव्याची उभारणी केली आहे. काथरगाव पुलासह बंधाºयाच्या उभारणीसाठी २५ हजार ७८७ रुपयांप्रमाणे प्रतीमीटर खर्च लागला.


३.१५ कोटी लीटर्स साठवणूक क्षमता!
काथरगाव येथील पुलासह बंधाºयाचे बांधकाम विक्रमीवेळेत म्हणजेच सुमारे एक महिन्याच्या कालावधीत पूर्णत्वास नेण्यात आले. बंधाºयाची पाणी साठवण क्षमता ३.१५ कोटी लीटर्स एवढी आहे. या बंधाºयामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यास मदत होवू शकते. त्याचप्रमाणे सिंचन आणि पिण्याचे किंवा उद्योगाच्या हेतूसाठी या पाण्याचा उपयोग होवू शकतो.

 
जागेवर बांधण्यात आलेला पहिलाच बंधारा!
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव पी.एल.बोंगीरवार यांच्या संकल्पनेत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे (प्रीकास्ट स्वरूपातील) पहिला पूलासह बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा निर्मिती करताना बाहेर पुनरूत्पादनक्षम  (कान्क्रीट) तयार करण्यात आले. नंतर त्याची मूल येथे जुळवणी करण्यात आली. मात्र, काथरगाव येथे जागेवरच पुलासह बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे जागेवर बांधण्यात आलेला काथरगाव हा राज्यातील एकमेव पुलासह बंधारा ठरतोय. काथरगाव येथील बंधाराही सेवानिवृत्त सचिव पी.एल.बोंगीरवार यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आला.
 

 
काथरगाव येथे अमरावती विभागातील पहिलाच पूलासह बंधारा उभारण्यात आला. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या पुलासह बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील बंधारा हा ह्यप्रीकास्टह्णस्वरूपातील असून, काथरगाव येथे जागेवरच पुलासह बंधाºयाची निर्मिती करण्यात आली आहे.
- राजेश एकडे
शाखा अभियंता, सा.बा.विभाग, जळगाव जामोद

Web Title: Water conservation cceleration due to bridges with dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.