मलकापूरवर जलसंकट; तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 12:11 PM2020-04-15T12:11:17+5:302020-04-15T12:11:22+5:30

लॉकडाऊन काळात पाण्यासाठी कोठे जावे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.

Water crisis over Malkapur; Water supply jam due to technical breakdown | मलकापूरवर जलसंकट; तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्प

मलकापूरवर जलसंकट; तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्प

googlenewsNext

- हनुमान जगताप
लोकमत न्युज नेटवर्क
मलकापूर: कोरोना विषाणूचे चार रुग्ण आढळल्याने आधीच दहशतीत असलेल्या मलकापुरवासीयांसमोर जलसंकट उभे ठाकले आहे. तांत्रिक बिघाडामुळे तब्बल पाऊन लाख लोकसंख्येच्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने लॉकडाऊन काळात पाण्यासाठी कोठे जावे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
मलकापूर शहरात कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने हाय रिस्क भाग म्हणून बद्री कॉम्प्लेक्स लगतचा भाग ‘सिल’ केला आहे. अशा बिकट परिस्थितीत हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर आधारित वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या धोपेश्वर येथील जॅकवेलजवळ जलवाहिनीच्या तांत्रिक बिघाडामुळे मलकापूरचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने पाऊण लाख जनतेपुढे जलसंकट उभे ठाकले आहे. शहरात बहूतांशी पाण्याच्या पर्यायी व्यवस्था नाही. घरात विविध कामांसाठी पाण्याची गरज भासते.त्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी वारंवार हात धुण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. खाजगी पाणी विक्रेत्यांना निर्धारित वेळ देण्यात आली आहे. त्यासाठी अव्वाचे सव्वा दरात पैसे मोजावे लागतात. तरीही सगळ्यांना पाणी मिळतेच असे नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पात्रात हतनूर धरणाचे बॅकवाटर मुबलक उपलब्ध आहे. तरी तांत्रिक अडचणीमुळे मलकापूरकरांवर जलसंकटाचे सावट आहे.


पाणी पुरवठा सभापती ‘नॉट आन्सरिंंग’ मोडवर
लाँकडाऊन व एरीया सिलमुळे त्रस्त असतांना जनतेपुढे जलसंकट गंभीरत बाब आहे. अशा परिस्थितीत नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ होमक्वारंटाईन तर पा.पु.सभापती अनिल जैस्वाल हे ‘नॉट आन्सरिंंग’ मोडवर असल्याने समस्या मांडायची कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

गटनेते राजेंद्र वाडेकर यांचा पुढाकार
मलकापूरात जलसंकट निर्माण झाले आहे.ते सोडवण्यासाठी दोन दिवसापासून जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा पालिकेतील भा.रा.काँ.गटनेते राजेंद्र वाडेकर यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे लवकरच उपाययोजना होतील अशी अपेक्षा आहे.

Web Title: Water crisis over Malkapur; Water supply jam due to technical breakdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.