वॉटर कप स्पर्धा : जळगाव जामोद तालुक्यातील तीन गावांना २३ लाखांची बक्षिसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 04:21 PM2018-08-12T16:21:26+5:302018-08-12T16:24:13+5:30

जळगाव जामोद : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेमध्ये जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव या गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Water Cup Competition: 23 lakhs prizes to three villages of Jalgaon Jamod taluka | वॉटर कप स्पर्धा : जळगाव जामोद तालुक्यातील तीन गावांना २३ लाखांची बक्षिसे 

वॉटर कप स्पर्धा : जळगाव जामोद तालुक्यातील तीन गावांना २३ लाखांची बक्षिसे 

googlenewsNext
ठळक मुद्देवडगाव सह पाटण आणि टाकळी खाती तिन्ही गावांना पाणी फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकूण 23 लाखांची बक्षिसे देण्यात आली आहे.  बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्यासह ३ तालुक्यांची निवड झाली होती.

जळगाव जामोद : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेमध्येजळगाव जामोद तालुक्यातील वडगाव या गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. वडगाव सह पाटण आणि टाकळी खाती तिन्ही गावांना पाणी फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकूण 23 लाखांची बक्षिसे देण्यात आली आहे.        ८ एप्रिल ते २२ मे २०१८ या कालावधीत पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा घेण्यात आली . त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्यासह ३ तालुक्यांची निवड झाली होती.  या गावाला पाणी फाउंडेशनच्या वतीने दहा लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाला. तर मुख्यमंत्री यांनी याठिकाणी तालुक्यातील तीन गावांना बक्षिसे जाहीर केली. त्यामध्ये सुद्धा वडगावला पाच लाखाचे बक्षीस मिळाले.  तर पाटण या गावाला पाच लाख आणि टाकळी खाती या गावाला तीन लाखाचे बक्षीस देण्यात आले. 

      १२ ऑगस्ट रोजी पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पाणी फाउंडेशन चे आमिर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, डॉक्टर अविनाश पोळ, जलसंधारण विभागाचे अपर सचिव एकनाथ डवले, प्रवीण परदेशी, अभिनेता आशुतोष गोवारीकर, पाणी फाउंडेशन टीमचे मार्गदर्शक पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी वडगाव येथून सुनिता गजानन पाटील आणि रत्नप्रभा भास्कर राऊत या दोन महिलांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वीकारले. त्यांना मुख्यमंत्री फडणवीस आमिर खान तथा मान्यवरांनी सन्मानित केले. या सोहळ्या करिता जळगाव जामोद तालुक्यामधून तालुका समन्वयक राहुल शिरसाट आणि ऋषिकेश ढोले यांच्या नेतृत्वात वडगाव, पाटण ,टाकळी खाती, आसलगाव, सुनगाव, वडशिंगी, इलोरा, भिंगारा, मांडवा, चारठाणा इत्यादी गावांमधून जलमित्र, भूमिपुत्र उपस्थित होते. 

 

Web Title: Water Cup Competition: 23 lakhs prizes to three villages of Jalgaon Jamod taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.