‘वॉटर कप’ स्पर्धा:  पोफळी-गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी एकटवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 05:46 PM2019-04-09T17:46:52+5:302019-04-09T17:47:22+5:30

दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या कायम झळा सोसणाºया पोफळी गावातील गावकºयांनी गाव पाणीदार करण्याचा निर्धार करीत ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता श्रमदानास प्रारंभ केला.

'Water Cup' competition: Villagers unite to get rid of drought | ‘वॉटर कप’ स्पर्धा:  पोफळी-गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी एकटवटले

‘वॉटर कप’ स्पर्धा:  पोफळी-गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी एकटवटले

Next

-नविन मोदे

धामणगाव बढे : जलसंधारणासाठी देशभरात गाजलेली स्पर्धा म्हणजे सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा. या स्पर्धेला ८ एप्रिल रोजी राज्यभरात सुरूवात झाली. दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या कायम झळा सोसणाºया पोफळी गावातील गावकºयांनी गाव पाणीदार करण्याचा निर्धार करीत ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता श्रमदानास प्रारंभ केला. मोताळा तालुक्यातील १३२ गावांचा दुष्काळा विरूद्ध सध्या संघर्ष सुरू आहे.
४५ दिवस चालणाºया या स्पर्धेदरम्यान गावातील दुष्काळ हद्दपार करण्याचा निर्धार गावकºयांनी केला व ८ एप्रिलच्या पहिल्या सेकंदापासून श्रमदान प्रारंभ केले. त्यासाठी पोफळी येथील सुमारे ४०० अबालवृध्द, महिला, पुरूष व तरूणाई सहभागी झाली. गावकºयांच्या एकी व नेकीच्या बळावर कसा चमत्कार होवू शकतो हे सिंदखेड गावाने राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकापर्यंत मजल मारत यापुर्वी सिध्द  केले आहे. आता असाच चमत्कार पोफळी येथे घडणार असून गावकºयांच्या भितीने व जिद्दीपुढे दुष्काळ वेशीवर आला आहे. पुढील ४५ दिवसात त्याला हद्दपार व्हावेच लागेल, असे यावेळी विस्तार अधिकारी दीपक माडीवाले यांनी सांगितले. गावकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी रात्री १२ वाजता हजर राहत त्यांनी श्रमदानात सहभाग घेतला. पोफळी वासियांनी प्रशिक्षण, अभ्यासदौरे, आगपेटीमुक्त शिवार, माती परिक्षण, नर्सरी, पाणी बचत तंत्रज्ञान, प्रत्येक घराजवळ शोषखड्डे यासारखी पुर्वतयारी याअगोदरच पुर्ण केली. पोफळी येथे ७ एप्रिलच्या रात्री १२ वाजता औपचारिक उद्घाटनानंतर प्रत्यक्ष श्रमदानास गावकºयांनी प्रारंभ केला. दुष्काळाला कायमस्वरूपी हद्दपार करून गाव पाणीदार करण्याचा संकल्प गावकºयांनी केला आहे. त्यासाठी गावकरी, पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग व तालुका प्रशासन एकवटले आहे. युवा उद्योजक नीलेश व्यवहारे, रावसाहेब देशमुख, दगडु सुरडकर यांचे मार्गदर्शनात काटेकोर नियोजन, युवकांचा प्रचंड प्रतिसाद, महिलांचा मोठा सहभाग आणि प्रशासनाची साथ यामुळे पोफळीमध्ये ‘तुफान आलया’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन व पाणी फाऊंडेशन कामावर लक्ष ठेवून मार्गदर्शन करीत आहे. गावातील उच्चशिक्षित तरूण राहुल व्यवहारे यांनी मागिलवर्षी अंबेजोगाई येथे पाणी फाऊंडेशनमध्ये काम केले. तेथील अनुभव देखिल गावकºयांना कामी येत आहे. 
 .
मोताळा तालुक्यातील १३ गावांनी वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला असून तेथे प्रत्यक्ष श्रमदानात गावकरी सहभागी झाले आहे. त्यामध्ये पोफळी, सिंदखेड, लपाली, पान्हेरा, उºहा, खामखेड, उबाळखेड, जयपूर, कोथळी, राजूर, पुनई, शेलापूर या गावांचा समावेश आहे. 
 
दुष्काळाविरूध्द गावकरी एकत्र आले. एकी व नेकीच्या बळावर गाव पाणीदार करण्याचा संकल्प गावकºयांनी केला आहे. त्यामध्ये आम्ही निश्चित यशस्वी होवू.
- नीलेश व्यवहारे
उद्योजक, पोफळी

 
दुष्काळाविरूध्द गावकºयांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. गावकºयांच्या मदतीला प्रशासन सज्ज असून शक्य तेव्हा गावकºयांसोबत श्रमदानात सहभागी होवू.
-दीपक माडीवाले
विस्तार अधिकारी, पंचायत समिती, मोताळा.

Web Title: 'Water Cup' competition: Villagers unite to get rid of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.