लाल मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

By admin | Published: May 18, 2017 12:18 AM2017-05-18T00:18:56+5:302017-05-18T00:18:56+5:30

बुलडाणा: सातत्याने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

The water of the farmers brought the red chillies! | लाल मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

लाल मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सातत्याने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात; मात्र मिरचीचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात मोताळा, मेहकर, चिखली तालुक्यात सिंचनाच्या सोयी असल्यामुळे अनेक शेतकरी मिरचीचे पीक घेतात. या भागात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करण्यात आली आहे; मात्र मिरचीचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सर्वत्रच ही परिस्थिती असल्यामुळे अन्य राज्यातील शेतकरीही मिरची विकण्याकरिता बुलडाण्यात आले आहेत. सध्या बुलडाण्यातील चिखली रोडवर कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाल मिरची विक्रीसाठी आणली आहे. ६० रुपये किलोने ही मिरची सध्या विकली जात आहे. कर्नाटकातून जवळपास १० कुटुंबातील सदस्यांनी मिरची विकण्यासाठी बुलडाणा शहरात दाखल झाले आहेत. ग्राहक या ठिकाणी मिरची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.

Web Title: The water of the farmers brought the red chillies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.