पाणी उशाला, कोरड घशाला; वरवट बकाल तालुक्याची स्थिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:50 AM2018-03-05T00:50:30+5:302018-03-05T00:50:30+5:30
वरवट बकाल : तालुक्यातील वरवट बकाल ग्राम पंचायतच्या दुर्लक्षामुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी असूनही वरवट बकाल ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नारायण सावतकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल : तालुक्यातील वरवट बकाल ग्राम पंचायतच्या दुर्लक्षामुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी असूनही वरवट बकाल ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वरवट बकाल ग्राम पंचायत अंतर्गत एकूण सुमारे पाच ते साडे पाच हजार लोकसंख्या असून, ग्रामपंचायतकडे एक विहीर व एक टूबेल तसेच भाडे तत्त्वावर एक टूबेल आहे; मात्र गावात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. या गंभीर समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस् थांमधून होत आहे. ग्राम विकास अधिकारी हे पद गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रभारी असल्याने ते सुद्धा मुख्यालयी राहत नाहीत; तसेच ग्रामपंचायतला दिलेल्या दिवसालासुद्धा त्यांची गैरहजेरी राहते. त्यामुळे गावातील विविध कामे खोळंबली आहेत.
ग्रामपंचायतकडे काकनवाडा शिवारात असलेल्या टूबेलवरून पाणी पुरवठा येत असल्याने सदर पाइप लाइनमधून पाणी गळतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय होताना दिसून येतो. परिणामी गावात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. अनेक वेळा ग्रामपंचायतकडून पाइप लाइन दुरुस्ती करण्यात आली; मात्र ही समस्या कायमच दिसून येत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढला असून, पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे गावात पाणी समस्या निर्माण झाली आहे. याकरिता पाइपलाइन गळती थांबून त्यावर नवीन पाइपलाइन करावी व गाव योजनेचे पाणीपुरवठा लवकर सुरु करण्यात यावा, अशी मागणी वरवट बकाल ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.
ग्रामविकास अधिकार्यांचे दुर्लक्ष
गावातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असून, याकडे ग्रामविकास अधिकार्यांचे दुर्लक्ष दिसून येते. तसेच दिलेल्या दिवसाला ग्रामविकास अधिकारी गावात हजर राहत नसल्याने नागरिकांचे अनेक कामे प्रलंबित पडत आहेत. ग्राम विकास अधिकारी कोरे यांचा शनिवार हा दिवस वरवट ग्रामपंचायत येथे असताना ते गैरहजर होते. दरम्यान, यासंदर्भात कोरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
पाण्याचा अपव्यय
वरवट बकाल गावाला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन वारंवार फुटत आहे. पाइपलाइन लिकेज होण्याचा या प्रकारामुळे पाण्याचा अ पव्ययसुद्धा वाढला आहे. त्यामुळे वरवट बकाल ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन पाइपलाइन प क्की करण्याची मागणी होत आहे.