लंबोधर गणेश मंडळातर्फे जल तपासणी उपक्रम

By admin | Published: September 3, 2014 08:56 PM2014-09-03T20:56:36+5:302014-09-03T20:57:31+5:30

जलजन्य आजार टाळण्यासाठी डोणगाव येथील लंबोधर गणेश मंडळाचा मोफत जलतपासणी उपक्रम.

Water inspection venture by Vrindhodar Ganesh Mandal | लंबोधर गणेश मंडळातर्फे जल तपासणी उपक्रम

लंबोधर गणेश मंडळातर्फे जल तपासणी उपक्रम

Next

डोणगाव : पावसाळ्यात दुषीत पाण्यामुळे जलजन्य आजार उद्भवतात. हे जलजन्य आजार टाळण्यासाठी स्थानिक लंबोधर गणेश मंडळाच्यावतीने १ सप्टेंबर पासून मोफत जलतपासणी उपक्रम राबविण्यात येत आहे.
पावसाळ्यात दुषीत पाण्यामुळे साथीचे आजार, जलजन्य आजार उद्भवतात. जलजन्य आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच जलजन्य आजार टाळण्यासाठी स्थानिक लंबोधर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक आगळावेगळा उपक्रमाचे आयोजन केले आहे. लंबोधर गणेश मंडळाच्यावतीने मोफत जलतपासणी करुन नागरिकांना जलजन्य आजाराविषयी माहिती दिल्या जात आहे. दरम्यान पाणी तपासून पाण्यात किती क्षार आहेत, पाणी िपण्यायोग्य आहे की नाही आदीविषयी नागरिकांना माहिती दिल्या जाते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष गणेश जुनघरे, गणेश घोगल, देवानंद आखाडे, देविदास खनपटे, गोपाल वायाळ, वैभव आखाडे, संजय घाटोळे, प्रशांत चोपडे, शंकर आखाडे, मोहन मोरे, रामभाऊ राऊत, रवि आढाव, विठ्ठल टाले, संग्राम लातुरकर आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Water inspection venture by Vrindhodar Ganesh Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.