कारपा येथे पाण्यासाठी हाहाकार
By Admin | Published: May 24, 2017 07:20 PM2017-05-24T19:20:34+5:302017-05-24T19:20:34+5:30
कारपा : येथे कृत्रीम पाणी टंचाई भासत असल्याने आता रात्रीबेरात्री सुध्दा पाण्यासाठी पायपिट करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारपा : येथे कृत्रीम पाणी टंचाई भासत असल्याने आता रात्रीबेरात्री सुध्दा पाण्यासाठी पायपिट करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कारपा येथे विळेगाववरुन पाणी पुरवठा केल्या जात असून येथील ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी नारिकांना पाण्यासाठी चांगलीच पाण्यासाठी पायपिट करावी लागत असल्याने गावातील चांगलीच पाण्यासाठी पायपिट करावी लागत असल्याने गावातील विहीरी सुध्दा आटुन गेल्याने आता रात्रीच्या वेळी पाणी भरावे लागत आहे. तर ग्रामपंचायतने पाणी पुरवठा विहीरीची खोलीकरणाचे काम केले असते तर ही पाळी आली नसती दुसरे म्हणजे गावताील बऱ्याचशा नागरिकांनी अवैध नळ कनेक्शन घेतल्याने खऱ्या नळधारकांना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. सध्या दुसऱ्या चौथ्या दिवशी पाणी पुरवठा केल्या जात असून नागरिकांनी मनमानी पाणी पुरवठा होत असलेल्या पाईपला छिद्र पाडून अवैध कनेक्शन घेतले तेव्हा त्या अवैध नळधारकांवर कोणतीही ग्रामपंचायत कडून कारवाई होत नसल्याने अवैध कनेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी मुग मिळत दिसत काढत आहे. सरपंच, सचिव यांना वारंवार पाण्याविषयी सुचना देवुनही कोणतीही पाण्यासाठी पावले उचलत नसल्याने नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. नळयोजनेवर ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यापेक्षा काही नागरिकच मनमानी करुन पाणी घेत असल्याने पुढील नळधारकांना पाणी मिळत नाही. परंतु याकडे आतातरी ग्रामपंचायतने त्वरित पाणी पुरवठ्याकडे लक्ष घालुन सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.