विहिरींची पाणीपातळी कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:40 AM2021-08-18T04:40:52+5:302021-08-18T04:40:52+5:30
जयस्तंभ चौकात खड्डयांचा प्रश्न गंभीर बुलडाणा: येथील जयस्तंभ चौकात खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील मुख्य चौक असलेल्या जयस्तंभ ...
जयस्तंभ चौकात खड्डयांचा प्रश्न गंभीर
बुलडाणा: येथील जयस्तंभ चौकात खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील मुख्य चौक असलेल्या जयस्तंभ चौकातून वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु या चौकातच रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे पाऊस येताच त्या खड्ड्यात पाणी साचते. परिणाम वाहनचालकांना खड्डयांचा अंदाज येत नाही.
रस्त्यावर वाहने लावणाऱ्यांमुळे वाढला त्रास
बुलडाणा : शहरातील जांभरून रोडवरच अनेकजण वाहने उभी करतात. या रस्त्यावर सर्वच रुग्णालये आहेत. रुग्णालयांमध्ये येणाऱ्यांना आपले वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेकांना रस्त्यावरच वाहने लावावी लागतात. त्यामुळे इतर वाहनचालकांना नाहक त्रास सोसावा लागतो.
मोताळा तालुक्यात ३५ टक्के पाऊस
मोताळा : जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मोताळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत मोताळा तालुक्यामध्ये सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या तुलनेत ३५.७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.