जलआंदोलन ; पाण्यात राहल्याने युवकांना त्वचेचे आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:23 PM2018-06-13T15:23:09+5:302018-06-13T15:23:09+5:30
मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी येथील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी युवकांनी ३० मे रोजी कोराडी धरणामध्ये जल आंदोलन केले होते. या जलआंदोलनामुळे काही युवकांना रोगराई झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी येथील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी युवकांनी ३० मे रोजी कोराडी धरणामध्ये जल आंदोलन केले होते. या जलआंदोलनामुळे काही युवकांना रोगराई झाली आहे. केलेल्या चौकशीवर १५ जुनपर्यंत कारवाई न झाल्यास २६ जूनपासून पुन्हा कोराडी धरणात जल आंदोलन करण्याचा इशारा युवकांनी दिला आहे. देऊळगाव माळी येथे १३ फेबु्रवारी रोजी गारपीट झाली होती. त्यावेळी तलाठी व कृषी सहाय्यक यांनी नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे केला होता. परंतू नुकसानग्रस्तांच्या अनुदान यादीतून अनेक शेतकºयांना वगळण्यात आले होते. वगळलेल्या नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, चुकीचा सर्वे करणाºया तलाठी व कृषी सहाय्यकावर कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष पवन गाभणे, स्वप्निल गाभणे, विशाल मगर, मोहन मगर, विजय सुरूशे, ज्ञानेश्वर अंभोरे, संदिप गाभणे, गजानन गाभणे, वैभव मगर, दीपक मगर आदींनी कोराडी धरणात जल आंदोलन केले होते. जवळपास दोन दिवस सदर युवक पाण्यामध्येच होते. तहसिलदार यांनी चौकशी करण्याच्या सूचना केल्यावरुन आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र सतत दोन दिवस युवक कोराडी धरणाच्या पाण्यामध्येच होते. या पाण्यामुळे पवन गाभणे व विजय सुरूशे यांच्या शरिरावरचे कातडे जात आहेत. युवक सतत आजारी पडत आहेत. एवढे होऊनही चौकशी समितीने केलेल्या अहवालावर १५ जूनपर्यंत कारवाई न झाल्यास २६ जून पासून कोराडी धरणात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)