महिन्यातून एकदाच मिळते पाणी !

By Admin | Published: April 13, 2016 01:07 AM2016-04-13T01:07:12+5:302016-04-13T01:07:12+5:30

पिंपळगाव काळे ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती.

Water once a month! | महिन्यातून एकदाच मिळते पाणी !

महिन्यातून एकदाच मिळते पाणी !

googlenewsNext

पिंपळगाव काळे (जि. बुलडाणा): पिंपळगाव काळे गावाला पाणीपुरवठा करण्याकरिता दोन पाणीपुरवठा योजना येथे कार्यान्वित करण्यात आल्या.मात्र या योजना केवळ नावालाच असून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु असून महिन्यातून जेमतेम अर्धा तास पाणी मिळते. १९८७ साली तात्पुरती नळयोजना व २00८ मध्ये महाजल योजना अशा दोन योजना सुरू झाल्या, महाजल योजना ही सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्‍यात होती; मात्र तरीही ही योजना पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये आराखड्याप्रमाणे काम होत नसल्यामुळे काही ग्रामस्थांनीसुद्धा तक्रारी केल्या व बदल्यात महाजल समितीत दंडसुद्धा झाला होता. शासकीय पातळीवर पाणीटंचाईची दखल घेऊन येथील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Water once a month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.