पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:58+5:302021-06-11T04:23:58+5:30
बुलडाणा तालुक्यात आठ पॉझिटिव्ह बुलडाणा : तालुक्यात आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बुधवारी (दि. ९) सापडले आहेत. आठवडाभरपासून तालुक्यातील कोरोना ...
बुलडाणा तालुक्यात आठ पॉझिटिव्ह
बुलडाणा : तालुक्यात आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बुधवारी (दि. ९) सापडले आहेत. आठवडाभरपासून तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या चांगलीच खाली आली आहे. कोविड सेंटरमध्येही खाटा रिकाम्या झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.
रस्त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष
बुलडाणा : शहरातील रस्त्यांच्या समस्येकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्त्यांवरून त्या शहराच्या विकासाचा चेहरासमोर येतो; परंतु बुलडाण्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्थाच समोर येत आहे. वेगवेगळ्या प्रभागांमध्ये रस्त्यांची समस्या हा मूळ प्रश्न कायम आहे.
‘अपाम’च्या माध्यमातून मिळाला आधार !
बुलडाणा : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात ६५३ पेक्षा अधिक बँक कर्जप्रकरणे मंजूर झाली आहेत. अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उभारण्यासाठी त्यामुळे मोठा हातभार मिळाला आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना १९९८ मध्ये केलेली आहे.
बीजउगवण शक्तीच्या प्रात्यक्षिक नावालाच
मेहकर : विविध कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बीजउगवण शक्तीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येते. हे प्रात्यक्षिक पेरणीपूर्वी दाखविल्यास त्याचा उपयाेग शेतकऱ्यांना होऊ शकतो; परंतु पेरणी झाल्यानंतर प्रात्यक्षिक दाखविण्यात येते.
रानतुळस निर्मूलन रखडले
बुलडाणा : वन विभागाच्या वतीने काही वर्षांपूर्वी रानतुळशीचे निर्मूलन करण्यात येणार होते. मात्र काही कारणांस्तव रानतुळशीचे निर्मूलन रखडले आहे. मात्र ही वनस्पती झपाट्याने वाढत असल्याने गवताळ भाग कमी होत आहे.
रेस्टॉरंटवर घेतली जाते खबरदारी
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंटमध्ये प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. बेसिनजवळ हँडवॉश आहे; तर जेवणासाठी डिस्पोजेबल प्लेटचा वापर केला जात आहे. हॉटेलमधील किचन ग्राहकांना दिसत नाही. ते दिसावे, तसेच काम करणारे कसे आहेत, हे दिसत असल्याने फूड पार्कचे किचन बाहेरच ठेवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला.
आरओचा व्यवसाय तेजीत
बुलडाणा : भागात धरणात मुबलक पाणी असूनही परिसरातील गावांमध्ये १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना आरओचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या परिसरात गल्लोगल्ली आरओ पाण्याचे एटीएम बसविण्यात आले आहे. त्यांचा व्यवसायही तेजीत आल्याचे चित्र आहे.
पशुवैद्यकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव
किनगावराजा : परिसरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने अडचणी येत आहेत. किनगाव राजा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाला जवळपास १२ ते १५ खेडी जोडली गेली आहेत.
मुरुमाचे अवैध साठे
बुलडाणा : खासगी जागेवर अवैधरीत्या शेकडो ब्रास कच्च्या मुरुमाचा साठा करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. मुरुमाच्या अवैध साठ्याकडे प्रशासनाकडूनही दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. अनेकजण खासगी जागेतील मुरुमाची खुलेआम विक्री करतात.
घरपोच पोषण आहाराची चौकशी व्हावी
बुलडाणा : अंगणवाड्यांतील पूर्वप्राथमिक शिक्षण थांबविण्याबरोबरच, मुलांना देण्यात येणारा पोषण आहार घरपोच देण्यात येत आहे; परंतु या पोषण आहार वाटपाचा गोंधळ निर्माण होत असून, घरपोच पोषण आहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.