जलजागृतीसाठी उद्या बुलडाण्यात ‘ वॉटर रन’ स्पर्धा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:27 PM2018-03-19T13:27:54+5:302018-03-19T13:27:54+5:30

  बुलडाणा : पाटबंधारे विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या जलजागृती सप्ताहातंर्गत २० मार्चला बुलडाण्यात ‘वॉटर रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

'Water Run' competition tomorrow in Buldhana | जलजागृतीसाठी उद्या बुलडाण्यात ‘ वॉटर रन’ स्पर्धा 

जलजागृतीसाठी उद्या बुलडाण्यात ‘ वॉटर रन’ स्पर्धा 

Next
ठळक मुद्देजिजामाता प्रेक्षागार येथून सकाळी  सात वाजता या स्पर्धेस सुरूवात होईल. नामवंत धावपटू या स्पर्धेत सहभागी होत असून या माध्यमातून जलजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.स्पर्धेतील पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे तीन हजार एक, दोन हजार एक आणि एक हजार एक रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.


बुलडाणा : पाटबंधारे विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या जलजागृती सप्ताहातंर्गत २० मार्चला बुलडाण्यात ‘वॉटर रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक जिजामाता प्रेक्षागरमधून या स्पर्धेस प्रारंभ होत आहे. नामवंत धावपटू या स्पर्धेत सहभागी होत असून या माध्यमातून जलजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.
जिजामाता प्रेक्षागार येथून सकाळी  सात वाजता या स्पर्धेस सुरूवात होईल.  दोन किलोमीटर अंतराची ही स्पर्धा राहील. शहरातील मुख्य मार्गावरून पाण्याचे महत्त्व सांगत स्पर्धेक यात सहभागी होत आहेत. ही स्पर्धा शालेय मुले, मुली व पुरूष गटात होणार आहे.  स्पर्धेतील पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे तीन हजार एक, दोन हजार एक आणि एक हजार एक रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सोबतच सन्मानचिन्ह सुद्धा प्रदान केल्या जाईल. वाटर रन स्पर्धा जिजामाता प्रेक्षागर, संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, तहसिल चौक ते सर्कीट हाऊस मार्गे परत जिजामाता प्रेक्षागार येथे येईल. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, जिजामाता प्रेक्षागार येथे यासाठी नोंदणी करण्यात येत आहे.  स्पर्धेसाठी सहाय्यक अधीक्षक अभियंता हेमंत सोळगे, श्रीराम हजारे, के. एच. ठाकरे, सुनील चौधरी, संजय जेवळीकर, महादेवराव कदम यांनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: 'Water Run' competition tomorrow in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.